scorecardresearch

लक्ष्मी देवीची प्रतिमा असलेला नेकलेस घालणं पडलं महागात, तापसी पन्नूविरोधात तक्रार दाखल

नेकलेसबरोबर रिव्हीलिंग ड्रेस घातल्याने धार्मिक भावना दुखावल्या आहेत.

taapsee-pannu-trolled-for-necklace
(फोटो – इन्स्टाग्राम)

काही दिवसांपूर्वी तापसी पन्नूने एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोवरून तिला चांगलंच ट्रोल करण्यात आलं होतं. तिला ट्रोल करण्याचं कारण तिने घातलेला नेकलेस होता. तिच्या डीप नेल रिव्हीलिंग ड्रेसवरील नेकलेसमध्ये नेटकरी तिच्यावर संतापले होते. आता त्याच नेकलेसमुळे तापसीविरोधात तक्रार देण्यात आली आहे.

“तुला लाज वाटली पाहिजे” तापसी पन्नूने घातलेल्या नेकलेसमुळे नेटकरी संतापले; नेमकं कारण काय?

‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, इंदूरमधील एका संघटनेने अभिनेत्री तापसी पन्नूविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पन्नूने एका फॅशन शोमध्ये लक्ष्मी देवीची प्रतिमा असलेला हार घालून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप संघटनेने केला आहे. छत्रीपुरा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली.

तापसी पन्नूविरोधात इंदूरमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. छत्रीपुरा ठाण्यातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “एकलव्य गौड नावाच्या एका व्यक्तीने एक तक्रार दिली आहे. ज्यात लिहिलंय की अभिनेत्रीने एका फॅशन शोमध्ये रॅम्पवॉक करताना लक्ष्मी देवीची प्रतिमा असलेला नेकलेस घातला होता. यावेळी तिने डीप नेक रिव्हीलिंग ड्रेस परिधान केला होता.

नेकलेसबरोबर रिव्हीलिंग ड्रेस घातल्याने धार्मिक भावना दुखावल्या आहेत, तसेच सनातन धर्माच्या प्रतिमेचं नुकसान झालं झालं आहे. याप्रकरणी तक्रारीचं पत्र प्राप्त झालं आहे पण, गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर कारवाई केली जाईल, असंही पोलिसांनी सांगितलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 13:16 IST

संबंधित बातम्या