Premium

Odisha Train Accident : ओडिशातील ट्रेन अपघातानंतर सलमान खानचं ट्वीट, भावुक होत म्हणाला, “खूप दुःख झालं आणि…”

Odisha Train Accident : ओडिशा ट्रेन अपघातानंतर सलमान खान भावुक, ट्वीट करत म्हणाला…

coromandel express odisha train accident
Odisha Train Accident : ओडिशा ट्रेन अपघातानंतर सलमान खान भावुक, ट्वीट करत म्हणाला…

Odisha Train Accident : ओडिशाच्या बालासोर या ठिकाणी झालेल्या कोरोमंडल ट्रेन अपघातात मृतांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत या अपघातातील मृतांची संख्या २३८ इतकी झाली आहे तर ९०० प्रवासी जखमी झाले आहेत. शुक्रवारी (२ मे) हा अपघात घडला. या अपघाताचे भयावह फोटो व व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राजकीय मंडळींसह कलाक्षेत्रातील मंडळीही या अपघाताबाबत सोशल मीडियाद्वारे व्यक्त होताना दिसत आहेत. सलमान खाननेही याबाबत ट्वीट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सेलिब्रिटी मंडळी ओडिशा ट्रेन अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहत आहेत. सलमानही या अपघाताची बातमी ऐकताच हादरुन गेला आहे. सलमान म्हणाला, “अपघाताबाबत ऐकून खूप दुःख झालं. मृतांच्या आत्म्यास शांती लाभो. त्यांच्या कुटुंबियांना ताकद मिळो. तसेच या अपघातामध्ये जखमी झालेल्यांचं देव रक्षण करो”.

आणखी वाचा – Odisha Train Accident : “याला जबाबदार कोण?” ओडिशातील अपघातानंतर विवेक अग्निहोत्रींचा संताप, म्हणाले, “अतिशय लज्जास्पद…”

सलमानने ट्वीट करत दुःख व्यक्त केलं आहे. तर दुसरीकडे अक्षय कुमार, किरण खेर, सोनू सुद, ज्युनिअर एनटीआर, चिरंजीवी अशा अनेक सेलिब्रिटींनी ट्वीट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच सोशल मीडियाद्वारेही मृत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. या भीषण अपघातामध्ये मृत तसेच जखमी प्रवाशांच्या कुटुंबियांची परिस्थितीही बिकट झाली आहे.

आणखी वाचा – Odisha train accident : “कुणाचा हात कापला गेला तर कुणाचा पाय….” कोरोमंडल एक्स्प्रेसच्या प्रवाशाने सांगितली आपबीती

शुक्रवारी रात्री या ट्रेन अपघाताची माहिती मिळताच एनडीआरएफच्या पथकांनी घटनास्थळी जाऊन मदत व बचाव कार्य सुरु केलं. बहनागा बाजार स्टेशन परिसरामध्ये लोकांची झालेली अवस्था अगदी वेदनादायी होती. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या अपघाताबाबत शोक व्यक्त केला. त्यांनी मृत प्रवाशांना श्रद्धांजली वाहिली. तसेच जखमी प्रवाशांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-06-2023 at 15:42 IST
Next Story
कतरिना कैफने चित्रपटाचे कौतुक केल्यावर विकी कौशल झाला रोमॅंटिक; पत्नीसाठी शेअर केली खास पोस्ट