करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉन यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट ‘क्रू’ प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. या चित्रपटात पोलिसाची भूमिका साकारणाऱ्या मराठमोळ्या तृप्ती खामकरने तिचा शूटिंगचा अनुभव सांगितला. तसेच या चित्रपटात तिला अनेक स्टार्सबरोबर काम करण्याची संधी मिळाली, असं ती म्हणाली. तिने अभिनेता दिलजीत दोसांझबरोबर काही सीन केले आहेत. अनुभव सांगताना तिने दिलजीतचं कौतुक केलं आणि तो आध्यात्मिक आहे, असं तिने नमूद केलं.

तृप्ती फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “मला पुन्हा दिलजीतबरोबर पुन्हा काम करायला नक्कीच आवडेल. तो देवासारखा माणूस आहे, तो खूप नम्र आहे. तो शिवभक्त आहे आणि तो सतत ओम नमः शिवाय जप करतो. जेव्हा तुम्ही त्याच्या आजूबाजूला असता तेव्हा तुम्हाला मंदिरात, देवाजवळ असल्यासारखं वाटते. तो खूप आध्यात्मिक आहे.”

१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”

आपल्याला दिलजीतसारखं व्हायचंय, असं तृप्तीने नमूद केलं. “दिलजीत एक अप्रतिम अभिनेता आहे. सीन शूट करताना तो तुमच्या डोळ्यांत पाहतो. मला त्याच्यासारखं व्हायचं आहे. जर मी १० टक्केही त्याच्यासारखे झाले तर मला वाटेल की मी जग जिंकलंय. तो खऱ्या अर्थाने ‘दिल-जीत’ (मनं जिंकणारा) आहे,” असं तृप्ती म्हणाली.

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट प्रदर्शित होऊन २० दिवस पूर्ण, एकूण कलेक्शन किती? जाणून घ्या

दिग्दर्शक राजेश ए कृष्णन यांनी शूटिंगदरम्यान तृप्तीला म्हटलं होतं की तिची भूमिका दिलजीत दोसांझपेक्षा मोठी आहे, पण तिला वाटलं की ते मस्करी करत आहेत. “शूटिंगदरम्यान, दिग्दर्शक (राजेश ए कृष्णन) मला म्हणाले की माझी भूमिका खूप महत्त्वाची आहे, अगदी दिलजीत दोसांझपेक्षाही माझी भूमिका मोठी आहे. मला वाटलं की ते मला बरं वाटावं म्हणून मस्करी करत आहेत, पण मी चित्रपट पाहिल्यावर मलाही आश्चर्य वाटलं की ते खरं बोलत होते,” असं तृप्ती म्हणाली. या चित्रपटात दिलजीत दोसांझ व कपिल शर्मा यांचे कॅमिओ आहेत.