scorecardresearch

डेव्हिड वॉर्नरलाही पडली ‘पठाण’ची भूरळ; शाहरुख खानचा चेहरा एडिट करत क्रिकेटरने लावला स्वत:चा फोटो, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

Video: शाहरुख खानच्या ‘पठाण’ने डेव्हिड वॉर्नरलाही लावलं वेड, पाहा व्हिडीओ

david warner pathaan video
डेव्हिड वॉर्नरलाही पडली पठाणची भूरळ. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ‘पठाण’ चित्रपटाने अवघ्या तीनच दिवसांत अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. प्रदर्शनाच्या दिवशी ५४ कोटींची कमाई करणाऱ्या ‘पठाण’ने जगभरात तब्बल ३०० कोटींची गल्ला जमवला आहे.

शाहरुखच्या चाहत्यांमध्ये ‘पठाण’ चित्रपटाची क्रेझ असल्याचं पाहायला मिळत आहे. चित्रपटगृहातील अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. शाहरुखच्या पठाणची भूरळ आता ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरलाही पडली आहे. बॉलिवूडचा चाहता असलेल्या वॉर्नरने ‘पठाण’चा एक व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये वॉर्नरने शाहरुखचा चेहरा एडिट करत स्वत:चा चेहरा लावला आहे.

हेही वाचा>> नाना पाटेकरांवर जडलेलं मनीषा कोईरालाचं प्रेम; पण अभिनेत्याला दुसऱ्याच अभिनेत्रीबरोबर रुममध्ये पाहिलं अन्…

वॉर्नरने शेअर केलेला मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओला त्याने “वाव काय चित्रपट आहे. या चित्रपटाला तुम्ही नाव देऊ शकता का?”, असं कॅप्शन दिलं आहे. वॉर्नरने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा>> शाहरुख खानच्या ‘पठाण’चा ‘गांधी-गोडसे’ला फटाका; सलग दोन दिवस चित्रपटाची लाखोंमध्ये कमाई

डेव्हिड वॉर्नर बॉलिवूडच्या प्रेमात आहे. बॉलिवूड चित्रपटांतील गाण्याचा तो चाहताही आहे. बॉलिवूडच्या अनेक गाण्यांवर तो कुटुंबियांसह रील व्हिडीओ बनवून शेअर करत असतो.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 18:15 IST