scorecardresearch

के.एल.राहुल व अथिया शेट्टीची लगीनघाई! वेडिंग डेस्टिनेशन पाहून तुम्हीही म्हणाल काय झाडी, काय डोंगर…

के.एल.राहुल व अथिया शेट्टी लवकरच अडकणार विवाहबंधनात; ‘या’ ठिकाणी बांधणार लग्नगाठ

के.एल.राहुल व अथिया शेट्टीची लगीनघाई! वेडिंग डेस्टिनेशन पाहून तुम्हीही म्हणाल काय झाडी, काय डोंगर…
के.एल. राहुल व अथिया शेट्टीची लगीनघाई. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

भारताचा स्टार क्रिकेटर के.एल.राहुल व बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी गेल्या अनके वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. अथिया व के.एल.राहुल लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. २०२३च्या जानेवारी महिन्यातच ते विवाहबद्ध होणार असल्याची माहिती आहे.

के.एल.राहुल व अथिया शेट्टीच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. परंतु, त्यांना ग्रण्ड वेडिंग करायचं नसून मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीतच त्यांना विवाहसोहळा पार पाडायचा आहे. आलिया भट्ट व रणबीर कपूर या बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलप्रमाणेच के.एल.राहुल व अथिया कुटुंबीय व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत विवाहबद्ध होणार असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा>>“तेजस्विनी पंडितला नोटीस पाठवली, मग उर्फीला का नाही?”, चित्रा वाघ यांचा महिला आयोगाला सवाल

हेही पाहा>>“सकारात्मक स्पर्धकांना बाहेर काढलं आणि…”, आरोह वेलकरणचं ‘बिग बॉस मराठी’बाबत मोठं वक्तव्य

के.एल.राहुल व अथिया यांच्या लग्नाच्या स्थळाबद्दलही माहिती समोर आली आहे. ‘ईटाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, लग्नासाठी के.एल.राहुल व अथिया आलिया-रणबीरच्या पावलावर पाऊल ठेवत घरातच लग्नसोहळा उरकरणार आहे. आलिया-रणबीरचा विवाहसोहळा वास्तू या त्यांच्या निवासस्थानी पार पडला होता. के.एल.राहुल व अथियाचं वेडिंग डेस्टिनेशन हे सुनील शेट्टीचं खंडाळ्यातील फार्म हाऊस असल्याची माहिती आहे.

हेही वाचा>>Video: पार्टी लूक, ग्लॅमरस अंदाज, डान्स अन्…; अमृता फडणवीसांच्या नवीन गाण्याचा टीझर पाहिलात का?

निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्म हाऊसवर के.एल.राहुल व अथिया लग्नगाठ बांधणार आहेत. त्यांच्या लग्नाला बॉलिवूड व क्रिकेट विश्वातील मोजके सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-01-2023 at 08:47 IST

संबंधित बातम्या