scorecardresearch

निळे केस अन् लाल रंगाची साडी; सुप्रसिद्ध अभिनेत्याने चक्क साडी नेसून केलं फोटोशूट, उर्फी जावेदची कमेंट चर्चेत

विजय वर्माने साडी नेसून व केस निळे रंगवलेले काही फोटोज शेअर केले आहेत.

vijay varma saree
(फोटो – इन्स्टाग्राम)

‘डार्लिंग्स’ फेम अभिनेता विजय वर्मा अभिनेत्री तमन्ना भाटियामुळे चांगलाच प्रसिद्धीझोतात होता. ते दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चांगलीच चर्चा होती. आता अभिनेता त्याच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आला आहे. त्याने साडी नेसून फोटोशूट केलं आहे. विजय वर्माचे साडी नेसलेले फोटो व्हायरल होत आहेत.

परिणीती चोप्रा-खासदार राघव चड्ढा विवाहबंधनात अडकणार? दोन्ही कुटुंबियांची बोलणी सुरू

विजय वर्माने साडी नेसून व केस निळे रंगवलेले काही फोटोज शेअर केले आहेत. हे फोटो त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत, ते आता व्हायरल झाले आहेत. एखाद्या अभिनेत्याने अशा प्रकारे साडी नेसून फोटोशूट केल्याने चांगलीच चर्चा होत आहे. या फोटोमध्ये विजयच्या स्टाइलचं कौतुक केलं जातं आहेत.

उर्फी जावेदने देखील विजय वर्माच्या या फोटोंवर कमेंट केली आहे आणि त्याला मॅजिकल म्हटलंय. एका चाहत्याने लिहिले, ‘विजय वर्मा आता पुढील फॅशन आयकॉन आहेस’. तर, अनेकांनी तो उत्तम अभिनेता असण्याबरोबरच स्टाइल आयकॉन असल्याचंही म्हटलं आहे. एकंदरीतच त्याच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 10:49 IST

संबंधित बातम्या