Jaideep Ahlawat Buys Luxury Property: बॉलीवूड अभिनेता जयदीप अहलावतने अनेक चित्रपट व वेब सीरिजमध्ये काम करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता मात्र अभिनेता त्याच्या चित्रपटांमुळे नाही तर त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

अभिनेत्याने काही दिवसांपूर्वीच मुंबईत घर विकत घेतले होते. मे २०२५ मध्ये जयदीप अहलावत व त्याची पत्नी ज्योती हु़ड्डा यांनी एक अपार्टमेंट खरेदी केले होते. पूर्णा अपार्टमेंट या प्रोजेक्टमध्ये त्यांनी अपार्टमेंट विकत घेतले होते. आता त्यांनी आणखी एक फ्लॅट खरेदी केला आहे. मुंबईच्या अंधेरी पश्चिम भागात हा फ्लॅट आहे.

जयदीप अहलावतने मुंबईत खरेदी केला दुसरा फ्लॅट

स्क्वेअर यार्डने दिलेल्या माहितीनुसार, जयदीप अहलावत व त्याच्या पत्नीने खरेदी केलेल्या फ्लॅटची किंमत १० कोटी इतकी आहे. या फ्लॅटचे कार्पेट क्षेत्रफळ १९५० चौरस फूट इतके आहे. या करारात दोन कार पार्किंग स्पेसचादेखील समावेश आहे. हा फ्लॅट खरेदी करताना अभिनेत्याने ६० लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि ३०,००० रुपये नोंदणी शुल्कदेखील भरले आहे. हा फ्लॅट जयदीपची पत्नी ज्योतीच्या नावावर आहे. ही सोसायटी पश्चिम अंधेरीच्या मध्यभागी आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेपासून फक्त तीन किलोमीटर आहे.

अभिनेत्याने याआधी खरेदी केलेल्या फ्लॅटची किंमतदेखील १० कोटी इतकी होती. जयदीपने एक-दोन महिन्याच्या अंतराने २० कोटींची संपत्ती विकत घेतली आहे. हे दोन्ही फ्लॅट एकाच बिल्डिंगमधील असले तर वेगवेगळ्या मजल्यांवर आहेत.

जयदीपने खरेदी केलेल्या फ्लॅट हा अंधेरी पश्चिम भागात आहे. अंधेरी पश्चिम हा परिसर वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, लिंक रोड, एसव्ही रोड आणि वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गाशी प्रकारे जोडलेला आहे. त्यामुळे गेल्या काही काळापासून येथील रहिवासी भाग वाढत आहे. मोठ्या प्रमाणात ऑफिस तयार होत आहेत. बिझनेस साठी हा भाग महत्वाचा असल्याचे मानले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जयदीप अहलावतच्या कामाबद्दल बोलायचे तर नुकताच तो ‘ज्वेल थीफ’मध्ये दिसला होता. यामध्ये सैफ अली खान प्रमुख भूमिकेत दिसला होता. याबरोबरच कुणाल कपूर, निकीता दत्ता हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. लवकरच तो पाताल लोक सीझन २ आणि इक्किस या चित्रपटांत दिसणार आहे.