‘कबीर सिंग’, ‘ॲनिमल’ यांसारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या आगामी ‘स्पिरीट’ या चित्रपटातून अभिनेत्री दीपिका पादुकोणने अचानक माघार गेल्याचं वृत्त होतं. दीपिकाच्या एक्जिटनंतर या चित्रपटात अभिनेत्री तृप्ती डिमरीची एण्ट्री झाली आहे. तृप्तीने याआधी संदीपच्या ‘ॲनिमल’मध्ये काम केलं होतं. ‘स्पिरीट’नंतर दीपिका प्रभासच्या ‘कल्की’ चित्रपटातून बाहेर पडल्याच्या चर्चा आहेत.

दीपिकाने चित्रपटाच्या सेटवर दिवसाला फक्त आठ तास काम करण्यासह काही अटी ठेवल्या होत्या, ज्या दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने मान्य करण्यास नकार दिला. त्यानंतर दीपिकाने चित्रपट सोडला. या निर्णयानंतर सोशल मीडियावर वाद सुरू झाला. यावर काही जण दीपिकाचे कौतुक करत तिच्या मागण्या रास्त असल्याचं म्हणत आहेत; तर काही जण याला ‘अवास्तव’ म्हणत आहेत.

या वादामुळे कामाची परिस्थिती आणि कामाचे तास याबद्दल चर्चा सुरू झाली. दीपिकाच्या मागण्यांना मणिरत्नम, अजय देवगण आणि सैफ अली खान यांनी पाठिंबा दिला होता. अशातच आता दीपिका ‘स्पिरीट’मधून बाहेर पडण्याबद्दल एक नवी चर्चा होताना दिसत आहे, ती म्हणजे दीपिकाने २५ कोटी रुपये आणि १० टक्के नफ्याचा वाटा मागितला. त्यामुळे हा वाद वाढला.

‘न्यूज१८ च्या सूत्रानुसार, “सत्य अगदी वेगळे आहे. चित्रपटातून बाहेर पडण्यामागील खरे कारण खूपच वेगळं आहे. दीपिकाने ३५ दिवसांच्या शूटिंगसाठी २५ कोटी रुपये मागितले. याशिवाय नफ्याचा १०% वाटाही मागितला होता. तसंच तिने तेलुगूमध्ये संवाद न करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. त्याचबरोबर ‘स्पिरिट’ची ​​कथा लीक झाली.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूत्रानुसार, “दक्षिणातील कलाकारांनी स्वतःचे संवाद बोलण्यासाठी हिंदी शिकले आहे. संदीप रेड्डी वांगा यांचा असा विश्वास आहे की, कलाकार स्वतःचे संवाद बोलल्याने प्रेक्षकांशी भावनिक संबंध निर्माण होतो. बरेच लोक वस्तुस्थिती जाणून घेतल्याशिवाय आणि निर्मिता-दिग्दर्शकाला कोणते परिणाम भोगावे लागतील हे समजून न घेता भाष्य करत आहेत, जे दिशाभूल करणारे आणि चुकीचे आहेत.”