Deepika Padukone banned Doing Three Things Ranveer Singh: रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण हे बॉलीवूडमधील लोकप्रिय कलाकार आहेत. या बॉलीवूड जोडप्याचा चाहतावर्ग मोठा आहे. दोन्ही कलाकारांनी आतापर्यंत विविध चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

रणवीर सिंहने २०१० ला ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून रणवीर सिंहने पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याच्याबरोबर अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत होती. ‘लूटेरा’, ‘रामलीला’, ‘बेफिकरे’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘दिल धडकने दो’, ‘सिम्बा’, ‘गली बॉय’, ‘पद्मावत’, ‘सर्कस’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’, ‘सिंगम’, ‘सूर्यवंशी’, ‘गुंडे’ अशा अनेक चित्रपटातून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातून रणवीर सिंगने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Award Banner

“माझ्या आयुष्यात घडलेली सर्वोत्तम गोष्ट…”

आता या सगळ्यात रणवीर सिंहच्या एका मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याला विचारले जाते की दीपिकाने एका मुलाखतीत सांगितले होते की लग्नानंतर तुमच्यावर काही बंधने घातली आहेत. त्यावर रणवीर म्हणतो की त्यांनी काय म्हणले? त्यावर त्याला सांगितले जाते की घराबाहेर जाण्याआधी जेवण करून जाणे तसेच तुम्ही कुठेही शुटिंग करत असाल तरी त्यांचा फोन तुम्ही उचलला पाहिजे.

दीपिकाने अजून काही बंधने घातली आहेत का? त्यावर रणवीर म्हणाला, “किती प्रेमळ त्यांची बंधने आहेत. मी गृहस्थीमध्ये बांधलो गेलो आहे. वेळेत उठणे, वेळेत जेवण करणे, वेळेत कामावर पोहोचणे, वेळेत घरी जाणे, वेळेत झोपणे या सगळ्या गोष्टी मी करत आहे. मी खूप सुधारलो आहे. माझ्या आयुष्यात घडलेली सर्वोत्तम गोष्ट आहे.”

रणवीर सिंह आणखी एका मुलाखतीत दीपिकाने त्याच्यावर कोणती बंधने लादली आहेत, याबद्दल खुलासा केला होता. फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत रणवीर सिंहनो तो कोणत्या तीन गोष्टी करू शकत नाही, याबद्दल वक्तव्य केले होते. त्या म्हणजे, खूप उशीरापर्यंत घराबाहेर राहू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जेवल्याशिवाय तो घराबाहेर जाऊ शकत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे तिचे फोन मी टाळू शकत नाही. पुढे तो म्हणाला होता दीपिका खूप घर सांभाळणारी आहे. मला ते खूप आवडते.

दरम्यान, दीपिका पादुकोण ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. रणवीर आणि दीपिकाने १४ नोव्हेंबर २०१८ ला त्यांनी लग्नगाठ बांधली होती.