लवकरच आई होणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या चर्चेत आहे. नुकतीच अभिनेत्रीने ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटला हजेरी लावली होती. या खास इव्हेंटसाठी दीपिकाने काळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. त्यालाच मॅचिंग हिल्स आणि सिल्वर रंगाची ज्वेलरी, तसेच हेअर स्टाईलसाठी पोनीटेल असा संपूर्ण लूक दीपिकाने केला होता. यादरम्यान दीपिकाच्या वाढलेल्या बेबी बंपने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. या इव्हेंटला दीपिकाबरोबरच प्रभास, अमिताभ बच्चन यांनी हजेरी लावली होती. या इव्हेंटमधले दीपिकाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

आता दीपिका पुन्हा एकदा तिच्या स्टायलिश लूकमध्ये दिसली आहे. इव्हेंटनंतर आता दीपिका रणवीरबरोबर मुंबई विमानतळावर दिसली. कारमधून उतरताना रणवीर तिला अगदी जेंटलमेनसारखा घ्यायला आला. एअरपोर्ट लूकसाठी दीपिकाने पुन्हा एकदा काळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. त्यालाच मॅचिंग स्वेटर आणि गॉगल परिधान करून दीपिकाने हा लूक पूर्ण केला होता. तर रणवीरही ऑल ब्लॅक आउटफिटमध्ये दिसला. दोघंही हातात हात पकडून एअरपोर्टच्या दिशेने निघाले.

हेही वाचा… “मराठी चित्रपटाची तुलना…”, सिद्धार्थ जाधवचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला…

दीपिका आणि रणवीरचा हा व्हिडीओदेखील खूप व्हायरल होतोय. दीपिकाचा बेबी बंप पाहून चाहत्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच या कपलच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “या कपलला कोणाची नजर नको लोगूदे”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “दीपिका तिच्या प्रग्नेन्सीमध्ये खूप सुंदर दिसतेय.” तर एका युजरने रणवीरचं कौतुक करत लिहिलं, “बेस्ट पती.”

हेही वाचा… “नकळत मला वाईट…”, अदिती राव हैदरीबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यामुळे शर्मिन सेगल झाली ट्रोल, म्हणाली…

दीपिका आणि रणवीरने सहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर १४ नोव्हेंबर २०१८ रोजी लग्नगाठ बांधली. या कपलचा लग्नसोहळा इटलीमध्ये पार पडला. लग्नाच्या सहा वर्षांनंतर फेब्रुवारीमध्ये दीपिकाच्या प्रग्नेन्सीची गुड न्यूज या कपलने चाहत्यांना दिली.

दरम्यान, दीपिका आणि रणवीरच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर दीपिका शेवटची ‘फायटर’मध्ये झळकली होती. आता अभिनेत्री ‘सिंघम अगेन’ या आगामी चित्रपटातदेखील दिसणार आहे. तसंच दीपिकाचा ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात साउथ स्टार प्रभास आणि बिग बी अमिताभ बच्चनदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर रणवीर सिंह ‘डॉन-३’ या चित्रपटात कियारा अडवाणीबरोबर झळकणार आहे.