scorecardresearch

Video: “ही मुंबई आहे दिल्ली नाही…” नेहमी ग्लॅमरस अंदाजात दिसणारी दीपिका पदुकोण ‘त्या’ लूकमुळे ट्रोल

दीपिकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

deepika troll

बॉलिवूड स्टार्स त्यांच्या हटके स्टाईल्समुळे नेहमीच चर्चेत असतात. ते काय कपडे घालतात यावर अनेकांचे लक्ष असतं. कधी कधी त्यांची स्टाईल सर्वांना आवडते तर कधी कधी त्यावरून त्यांच्यावर टीकाही केली जाते. आता दीपिका पदुकोण तिने परिधान केलेला कपड्यांमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. त्याचबरोबर तिला त्यावरून आता ट्रोलही केलं जात आहे.

दीपिका पदुकोण नेहमीच तिच्या ग्लॅमरस अंदाजाने सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. अवॉर्ड फंक्शन असो, फोटोशूट असो किंवा तिचा एअरपोर्ट लूक असो; तिने परिधान केलेले कपडे चर्चेचा विषय बनतात. आता पुन्हा एकदा तसंच काहीसं पाहायला मिळालं. आणि यावेळी तिचं कौतुक करण्याऐवजी नेटकरी तिला ट्रोल करू लागले आहेत.

आणखी वाचा : गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्ने अभिषेक बच्चनची एकदा नव्हे तर दोनदा घेतली दखल; कारण वाचून व्हाल थक्क

दीपिकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. नुकतीच ती मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी तिने काळ्या रंगाचा टॉप, जीन्स आणि त्यावर मल्टी कलरचं जाड जॅकेट घातलं होतं. परंतु तिने केलेली ही स्टाईल नेटकऱ्यांना काय पसंत पडली नाही. तिने परिधान केलेल्या जाड जॅकेटची मुंबईचं हवामान बघता काहीही गरज नाही असं म्हणत आता अनेकजण तिच्यावर निशाणा साधत आहेत.

हेही वाचा : भर कार्यक्रमात दीपिका पदुकोणला झाले अश्रू अनावर, म्हणाली, “आज संपूर्ण जग…”

या व्हिडिओवर कमेंट करते का नेटकऱ्याने लिहिलं, “तू मुंबईत आहेस दिल्लीत नाहीस.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “कुठून येतात असे लोक… उन्हाळ्यात जॅकेट, थंडीत हाफ स्कर्ट, काळोखात गॉगल…” आणखी एक नेटकरी म्हणाला, “मुंबईमध्ये बर्फ पडतोय का? तिने से जॅकेट घातलाय तितका गारवा मुंबईत तर नाहीये पण दिल्लीमध्येही नाहीये.” आता दीपिकाचा हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 13:17 IST
ताज्या बातम्या