करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा शो बॉलीवूडमधील लोकप्रिय टॉक शो आहे. मात्र आता या शोचा शेवटचा सीझन येणार असल्याचं त्याने सांगितलं आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या २२ वर्षांपासून सुरू असलेल्या या शोमध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटी आले आणि अनेकांनी केलेली व्कतव्य चर्चेचा विषय बनली. दीपिका पादुकोणचाही यामध्ये समावेश आहे.

अभिनेत्री सोनम कपूरबरोबर दीपिकाने करण जोहरच्या कॉफी विथ करणच्या तिसऱ्या सीझनच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी बऱ्याच गप्पा मारल्या आणि त्याचीनंतर बरीच चर्चासुद्धा झाली. त्यावेळी दीपिका तिच्या खासगी आयुष्यातील प्रेमसंबंधांमुळे चर्चेत होती. अभिनेत्रीने कार्यक्रमात हजेरी लावण्याच्या जवळपास वर्षभराआधी तिचं व रणबीर कपूरचं ब्रेकअप झालं होतं असं म्हटलं जातं. त्यानंतर लगेच रणबीर कतरिना कैफबरोबर रिलेशनशिपमध्ये आला होता असंही म्हटलं जातं. याच पार्श्वभूमीवर करणने दीपिकाला या शोमध्ये कतरिना कैफबद्दल विचारल्याचंही म्हटलं जातं.

करणने कतरिनाला काय विचारलं?

करणच्या ‘कॉफी विथ करण’मध्ये दीपिका व सोनम एकत्र उपस्थित होत्या. यावेळी त्याने दीपिकाला आधी “तू सिद्धार्थ मालियाला डेट करत आहेस का?” असं विचारलं त्यावर दीपिकाने हसत हसत “कोणास ठाऊक टिंग टिंग… मला माहीत होतं. अपेक्षितचं होतं”. असं उत्तर दिलं होतं. त्यावर त्याने तिला “तू कोणाला डेट करतेय मग?” असं विचारलं. पुढे करणने तिला कतरिनाबद्दल विचारलं. करण दीपिकाला म्हणाला, “तुला कतरिना कैफ आवडते का?”.

दीपिका कतरिनाबद्दल काय म्हणाली?

दीपिका यावर थोडीशी गंभीर होत म्हणाली, “मी तिला इतकं ओळखत नाही की मी सांगू शकेन ती मला आवडते की नाही” पुढे त्याने तिला “मग जर ती तुझ्या समोर आली तर तू तिच्याशी बोलशील का?” असं विचारलं त्यावर तिने “हो का नाही ती माझी सिनीयर आहे.” असं उत्तर दिलं. त्यावेळी तिच्याबरोबर उपस्थित असलेली सोनमही कतरिनाबद्दल म्हणाली, “हो ती खूप सुंदर आहे आणि ती आमच्यापेक्षा ३ वर्षे आधी इंडस्ट्रीत आली”

दरम्यान, दीपिकाबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर लगेच कतरिनाबरोबर रिलेशनशिपमध्ये आला असं म्हटलं जातं. मात्र पुढे त्यांचंही ब्रेकअप झालं. पुढे दीपिकाने रणवीर सिंहबरोबर लग्न केलं तर कतरिनाने विकी कौशलबरोबर आणि रणबीरने आलिया भट्टबरोबर लग्नगाठ बांधली. आता हे तिघेही त्यांच्या त्यांच्या आयुष्यात खूप पुढे गेले असून तिघेही सध्या त्यांच्या जोडीदारांबरोबर त्यांच्या मुलांच्या जन्मानंतर पालकत्व अनुभवत आहेत.