Deepika Padukone Education : इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत जे पेशाने डॉक्टर, इंजिनीअर आहेत, पण त्या क्षेत्रात ते आता काम करत नसून आता पूर्णपणे अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत; तर काही कलाकारांनी अभिनय क्षेत्रात काम करता यावं यासाठी शिक्षण सोडलं आहे. यापैकीच एक नाव म्हणजे बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण. पण, तुम्हाला माहीत आहे का दीपिका पादुकोणचं शिक्षण किती झालं आहे?

दीपिका पादुकोण सध्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. येत्या काळातही ती काही आगामी चित्रपटांतून झळकणार आहे. दीपिकाला बॉक्स ऑफिस क्वीनही म्हटलं जातं. तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण, तुम्हाला माहीत आहे का तिने याच क्षेत्रात काम करण्यासाठी शिक्षण सोडलं होतं. दीपिका किती शिकली आहे, कोणत्या शाळेतून तिचं शिक्षण झालं आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

दीपिका पादुकोणचं शिक्षण किती?

५ जानेवारी १९८६ ला डेन्मार्कमध्ये जन्मलेल्या दीपिकाने एबीपीच्या वृत्तानुसार सोफिया हायस्कूल, बंगळुरूमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. यानंतर तिने माउंट कार्मेल कॉलेज, बंगळुरूमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. पण, मॉडेलिंग आणि अभिनयात करिअर करण्यासाठी तिने शिक्षण अर्ध्यातच सोडलं. तिने मॉडेलिंगपासून तिच्या करिअरची सुरुवात केलेली.

उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार २००४ मध्ये तिने नामांकित ब्रँडच्या जाहिरातींमध्ये काम केलं आणि किंगफिशरच्या कॅलेंडरमुळे तिला ओळख मिळालेली. त्यानंतर २००६ मध्ये कन्नड चित्रपट ‘ऐश्वर्य’मधून तिने चित्रपटसृष्टीत काम केलं. त्यानंतर तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. दीपिकाने इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय कलाकारांबरोबर काम केलं आहे. आज ती बॉलीवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

दरम्यान, दीपिका पादुकोण फार शिकलेली नसून तिने तिचं शिक्षण अभिनयासाठी अर्ध्यातच सोडलं असलं तरी अभिनेत्रीला तिच्या आवडीच्या क्षेत्रात भरपूर यश मिळालं आहे. तिने कलेच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकत इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. यासह ती एक उद्योजिकासुद्धा आहे.