बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी दीपिका पदुकोण व रणवीर सिंग कोणत्या ना कोणत्या कारणाने कायम चर्चेत असतात. दोघांची ऑनस्क्रीन व ऑफस्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळते. दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र हजेरी लावत असतात. काही दिवसांपूर्वी या दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात दीपिका रणवीरला इग्नोर करताना दिसली होती. त्यानंतर त्यांचा एक नवा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अखेर ठरलं! परिणीती चोप्रा-राघव चड्ढांच्या नात्यावर शिक्कामोर्तब; ‘आप’ खासदार ट्वीट करत म्हणाले… आता व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये दीपिका शाहरुखचा डायलॉग म्हणताना दिसत आहे."कहते हैं अगर किसी चीज को शिद्दत से चाहो; तो पुरी कायनात उसे तुमसे मिलने की कोशिश में लग जाती है" हा 'ओम शांती ओम'मधील सुप्रसिद्ध डायलॉग म्हणताना दिसत आहे. याला उत्तर देताना रणवीरने 'गोलियों की रासलीला राम-लीला'मधील स्टाइलमध्ये "मला विचारा..मी याची खात्री देऊ शकतो," असं म्हटलं. ‘इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स २०२३’ या कार्यक्रमामध्ये दीपिका व रणवीर यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला दीपिकाचे वडील प्रकाश पादुकोणही उपस्थित होते. दरम्यान दीपिकाच्या एका कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दीपिका व रणवीर रेड कार्पेटच्या दिशेने जात होते. यावेळी रणवीरने एकत्र पुढे जाण्यासाठी दीपिकाला हात दिला. रणवीरने हात पुढे करताच दीपिकाने मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं. ती तिच्या वडिलांसह पुढे गेली. दीपिकाच्या या कृतीवरुनच सध्या सोशल मीडियावर दीपिका व रणवीरच्या नात्याबाबत चर्चा रंगल्या होत्या. पण त्यांच्या व्हिडीओमुळे दोघांच्या नात्यात सर्वकाही ठीक चाललंय, असं दिसून येतंय. त्यामुळे दोघांमध्ये बिनसल्याची चर्चा निव्वळ अफवा आहेत.