Deepika Padukone Ranveer Singh Second Baby Girl: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांच्या आयुष्यात एक अत्यंत आनंददायी आणि खास क्षण आला आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे दुसऱ्यांदा आई-बाबा झाले असून दीपिकाने आज शनिवारी, १९ सप्टेंबर २०२६ रोजी एका सुंदर चिमुकलीला जन्म दिला आहे. दीपिकाला दुसरी मुलगी झाली आबे, ‘दीपवीर’च्या घरात पुन्हा एकदा एका लक्ष्मीचे आगमन झाल्याने बॉलीवूड सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून या जोडप्यावर प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
दीपिका पादुकोण व रणवीर सिंह यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून लेकीच्या जन्माची माहिती दिली. रणवीर व दीपिका शुक्रवारी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले होते, त्यामुळे लवकरच तिची प्रसूती होईल अशा चर्चा होत्या. दुआच्या जन्मावेळीही सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिची प्रसूती झाली होती. आधीप्रमाणेच यावेळी गणेशोत्सवातच दीपिका व रणवीर यांनी आपल्या दुसऱ्या बाळाचं स्वागत केलं.
दीपिका व रणवीर यांनी ‘वेलकम बेबी गर्ल’ असा आशय असलेली पोस्ट इन्स्टाग्रामवर केली आहे. या पोस्टवर सेलिब्रिटी व चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
दीपिका पादुकोण व रणवीर सिंहची पोस्ट
दरम्यान, ६ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये सोशल मीडियावर आपल्या लग्नाची अधिकृत घोषणा केली. १४ आणि १५ नोव्हेंबर २०१८ रोजी इटलीतील प्रसिद्ध ‘लेक कोमो’ इथे त्यांचा विवाह सोहळा पार पडला होता. लग्नानंतर सहा वर्षांनी २९ फेब्रुवारी २०२४ रोजी दीपिकाने गरोदर असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले. ८ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दीपिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर १९ एप्रिल २०२६ रोजी दीपिकाने ती दुसऱ्यांदा गरोदर असल्याचं जाहीर केलं. आता त्यांच्या घरी पुन्हा एकदा चिमुकलीचं आगमन झालं आहे.
