scorecardresearch

FIFA World Cup लूकवरून ट्रोल झाल्यानंतर दीपिका पदुकोण म्हणाली, “तो ड्रेस खूपच…”

दीपिकाने १८ डिसेंबर रोजी फिफा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचं अनावरण केलं होतं. त्या लूकवरून तिला ट्रोल करण्यात आलं होतं.

FIFA World Cup लूकवरून ट्रोल झाल्यानंतर दीपिका पदुकोण म्हणाली, “तो ड्रेस खूपच…”

सध्या अभिनेत्री दीपिका पदुकोण ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यामध्ये तिने परिधान केलेल्या भगव्या बिकिनीमुळे वादात सापडली आहे. आठवडाभरापासून तिच्या बिकिनीवरून वाद सुरू आहे. अशातच दीपिकाने १८ डिसेंबर रोजी फिफा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचं अनावरण केलं होतं. फिफा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचं अनावारण करणारी ती पहिली ग्लोबल स्टार होती. यावेळी दीपिकाने थोडा हटके आणि स्टायलिश ड्रेस परिधान केला होता. पण यावरून तिला ट्रोल करण्यात आलं होतं.

दीपिकाने यावेळी काळ्या रंगाची पँट, पांढऱ्या रंगाचं शर्ट व ब्राउन रंगाचं लेदर जॅकेट परिधान केलं होतं. या लूकवरून लोकांनी फक्त दीपिकालाच नाही तर तिची स्टायलिश शालीन नथानीलाही ट्रोल केलं. अशातच दीपिकाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये तिने तिच्या फिफामधील ड्रेसबद्दल माहिती दिली आहे. तसेच हा ड्रेस शालीन नथानी स्टाईल केला नसल्याचंही या व्हिडीओतून कळतंय. ती म्हणाली, “फिफा वर्ल्ड कप २०२२च्या फिनालेमध्ये ट्रॉफीचं अनावरण करायला मिळणं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी पहिल्यांदाच फिफाच्या अंतिम सामन्यात हजेरी लावलीये.” तिने कॅरी केलेला खास लूक हा तिचा मित्र आणि फ्रेंच फॅशन डिझायनर निकोलस गेस्क्वायरने तयार केला होता. निकोलस गेस्क्वेअर २०१३ पासून हाऊस ऑफ लुई व्हिटॉनचा वूमन क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे.

“अंगभर कपडे…” भगवी बिकिनी वादानंतर Fifa World Cup 2022साठी केलेल्या लूकमुळे दीपिका पदुकोण ट्रोल

दीपिका म्हणाली, “फिफामध्ये मी परिधान केलेला ड्रेस खूपच कंफर्टेबल होता. माझा खास मित्र निकोलसने तयार केलेला हा एक खास लूक होता. मला या लूकबद्दल सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे तो फिफाची ट्रॉफी लॉन्च करण्यासाठी परफेक्ट होता.”

दरम्यान, कतारमध्ये गेल्यामुळे दीपिका पदुकोणने अंगभर कपडे परिधान केले आहेत. दीपिकाने रेनकोट का परिधान केला आहे, रणवीर सिंगलाच दीपिका कॉपी करते, अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करताना केल्या होत्या. काही नेटकऱ्यांच्या मते दीपिकाने त्या कार्यक्रमात साडी नेसून जायला हवं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-12-2022 at 12:25 IST

संबंधित बातम्या