Deepika Padukone and Ranveer Singh Welcome Baby Girl : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या घरी लक्ष्मीच आगमन झालं आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणने गोंडस मुलीला जन्म दिल्याचं आता निश्चित झालं आहे. स्वतः दीपिकाने आई झाल्यानंतर सोशल मीडियावर पहिली पोस्ट करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. त्यामुळे सध्या दीपिका व रणवीर खूप चर्चेत आले असून बॉलीवूड सेलिब्रिटींसह चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोण ( Deepika Padukone ) आणि अभिनेता रणवीर सिंह आता आई-बाबा झाले आहेत. काल (७ सप्टेंबर) दीपिकाला गिरगांव चौपाटीच्या रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी दीपिकाने रणवीर व दोन्ही कुटुंबासह सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. त्यानंतर अभिनेत्री आईबरोबर रुग्णालयात दाखल होताना पाहायला मिळाली. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी दीपिका आई झाली. आज दीपिका व रणवीरला कन्यारत्न प्राप्त झाले. यासंदर्भात तिने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

Vikas sethi passes away
Vikas Sethi Passes Away: ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ फेम अभिनेता विकास सेठीचा मृत्यू; झोपेतच आला हृदयविकाराचा झटका
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
renukaswamy offere to pavithra gowda live in relationship
Renukaswamy Case Chargesheet: ‘लिव्ह इनमध्ये ये, महिन्याला १० हजार देतो’, चाहत्याची अभिनेत्रीला ऑफर; हत्या होण्यापूर्वी पाठवले गुप्तांगाचे फोटो
navra maza navsacha 2 marathi actor Dhruva datar honest review
“चित्रपट खरंच खूप वाईट आहे” ‘नवरा माझा नवसाचा २’बद्दल मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत; म्हणाला, “सॉरी पण उगाच कौतुक…”
Sonakshi Sinha-Zaheer Iqbal celebrate their first Ganesh Chaturthi
Sonakshi Sinha-Zaheer Iqbal: ‘लव्ह जिहादवाले कुठं गेले?’, सोनाक्षी-इक्बालनं गणेशोत्सव साजरा करताच ट्रोलर्सनी केल्या भलत्याच कमेंट
malaika arora father anil arora suicide
अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, इमारतीवरून उडी घेत संपवलं जीवन
govinda fan styed at his home as maid
“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”
Deepika Padukone and Ranveer Singh became parents to a baby girl
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग झाले आई-बाबा, अभिनेत्रीने दिला गोंडस मुलीला जन्म

हेही वाचा – Bigg Boss Marathi : जान्हवी किल्लेकरमुळे चाहत्याचं झालं नुकसान, म्हणाला, “तुमच्यामुळे बायकोने…”

दीपिका पादुकोणने ( Deepika Padukone ) कोणतंही कॅप्शन न लिहिता एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमधून तिने आपल्या चिमुकल्या लेकीचं स्वागत केलं आहे. “वेलकम बेबी गर्ल…८-९-२०२४…दीपिका अँड रणवीर”, असं या फोटोमध्ये लिहिण्यात आलं आहे.

दीपिकाच्या या पोस्टवर अवघ्या काही मिनिटांत बॉलीवूड सेलिब्रिटींसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री आलिया भट्ट, क्रिती सेनॉन, शर्वरी वाघ, पूजा हेगडे, अर्जुन कपूर, सुनील ग्रोव्हर, श्रद्धा कपूर, हरभजन सिंग, गोहर खान, रश्मी देसाई अशा अनेक कलाकारांनी दीपिकाच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

…म्हणून दीपिका पादुकोणला केलेलं ट्रोल

फेब्रुवारी २०२४मध्ये दीपिका पादुकोण ( Deepika Padukone ) आणि रणवीर सिंगने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आई-बाबा होणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर दीपिकाचं बेबी बंप दिसत नसल्यामुळे फेक प्रेग्नेंसी असल्याचं म्हटलं जाऊ लागलं. अनेक कार्यक्रमात अभिनेत्री हाय हिल्समध्ये फिरताना दिसली. त्यावरूनही तिला ट्रोल केलं गेलं. पण काही दिवसांपूर्वी दोघांनी मॅटर्निटी फोटोशूट करून ट्रोलर्सची तोंड बंद केली.

हेही वाचा – Video: “मधेमधे तिच्या तोंडून…”, पंढरीनाथ कांबळेने निक्कीला भरवला कडू लाडू, कारण देत म्हणाला…

अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या ( Deepika Padukone ) कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती अलीकडेच नाग अश्विनच्या ‘कल्कि 2898 एडी ‘चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात दीपिका प्रभास, अमिताभ बच्चन आणि कमल हासन यांच्याबरोबर पाहायला मिळाली होती. आता दीपिका लवकरच रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटात महिला पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. यात तिच्यासह पती रणवीर सिंग, अजय देवगण, करिना कपूर, अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफसह तगडी कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत.