बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच आई होणार आहे. लग्नाच्या सहा वर्षांनंतर रणवीर-दीपिकाच्या घरी नव्या सदस्याचं आगमन होणार आहे. त्यामुळे सध्या अभिनेत्रीच्या घरी आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. रणवीर-दीपिकाने एकमेकांना अनेक वर्षे डेट केल्यावर २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांकडे बॉलीवूडची आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. फेब्रुवारी महिन्यात रणवीर-दीपिकाने लवकरच गूड न्यूज देणार असल्याचं जाहीर केलं होतं.

रणवीर-दीपिका येत्या सप्टेंबर महिन्यात त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. यादरम्यान दीपिका आपली सगळी कामं सांभाळून बाळाची काळजी घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, गरोदरपणाची घोषणा केल्यावर दीपिकाने सोशल मीडियावर एकदाही तिच्या बेबी बंपबरोबर फोटो शेअर केला नव्हता. आज जवळपास चार महिन्यांनी अभिनेत्रीने तिच्या बेबी बंप दिसेल असा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : “सोनाक्षी-झहीरला मुलं झाल्यावर…”, आंतरधर्मीय विवाहावर स्वरा भास्करने मांडलं मत; म्हणाली, “आपल्या देशात…”

दीपिका पदुकोणने या फोटोमध्ये काळ्या रंगाचा बॉडी कॉन ड्रेस परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये लवकरच आई होणारी दीपिका खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीने वेगवेगळ्या पोज देऊन बेबी बंपसह खास फोटोशूट केलं आहे. या फोटोंना कॅप्शन देत दीपिकाने “आजच्यासाठी पुरे झालं…आता मला खूप भूक लागलीये” असं लिहिलं आहे. दीपिकाच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

दीपिका यापूर्वी पिवळ्या रंगाच्या सुंदर अशा ड्रेसमध्ये फोटोशूट केलं होतं. परंतु, यामध्ये अभिनेत्रीचा बेबी बंप दिसत नव्हता. सध्या दीपिकाची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, लवकरच दीपिका अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय ती प्रभास मुख्य भूमिकेत असणाऱ्या ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटात देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसेल.

हेही वाचा : Video : नवरा हाच हवा! अक्षरा-अधिपतीचं वटपौर्णिमा विशेष गाणं पाहिलंत का? मास्तरीण बाईंनी केलाय झकास डान्स

रणवीर व दीपिकाची लव्हस्टोरी

‘गोलियों की रासलीला रामलीला’ या चित्रपटापासून रणवीर व दीपिकाची लव्हस्टोरी सुरू झाली. या चित्रपटात दोघांनी पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. त्यानंतर दोघे ‘बाजीराव-मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ या चित्रपटात एकत्र झळकले. सहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रणवीर व दीपिकाने १४ नोव्हेंबर २०१८ रोजी लग्नगाठ बांधली. इटलीमध्ये दोघांच्या शाही लग्नसोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. २०१५ मध्ये रणवीर आणि दीपिकाने गुपूचप साखरपुडाही केला होता. एका मुलाखतीत रणवीरने याबाबत खुलासा केला होता.