बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणला ब्रेस्ट इम्प्लांट करण्याचा सल्ला देण्यात आला होता. दीपिकाने एका मुलाखतीत बोलताना तिला आतापर्यंत लोकांकडून मिळालेला सर्वात चांगला व वाईट सल्ला कोणता होता, हे उघड केलं. दीपिकाने दिलेल्या माहितीनुसार, ती १८ वर्षांची असताना कोणीतरी तिला ब्रेस्ट इम्प्लांट करण्यास सांगितलं होतं.
हेही वाचा – “मी मायलेकीला सोडलं नाही”; गौतमी पाटीलच्या वडिलांचा दावा; म्हणाले, “मी पुण्यात असताना…”
‘फिल्मफेअर’च्या एका मुलाखतीत, दीपिकाला तिला मिळालेला सर्वोत्तम आणि सर्वात वाईट सल्ला कोणता, याबद्दल विचारण्यात आलं होतं. “शाहरुख खान चांगला सल्ला देतो आणि मला त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. मला त्याच्याकडून मिळालेल्या सर्वात मौल्यवान सल्ल्यांपैकी एक म्हणजे त्याने म्हटलं होतं की तुला माहीत असलेल्या लोकांबरोबर काम कर, यामुळे तुझा वेळ चांगला जाईल. कारण चित्रपट बनवत असताना तुम्ही जीवन जगत असता, आठवणी गोळा करत असता आणि अनुभव घेत असता,” असं दीपिका तिला मिळालेल्या सर्वात चांगल्या सल्ल्याबद्दल म्हणाली.
हेही वाचा – शारीरिक संबंधांना खेळ म्हणून मान्यता, ‘या’ देशात होणार पहिली सेक्स चॅम्पियनशिप
दीपिकाने चांगल्यानंतर वाईट सल्ल्याचाही उल्लेख केला. “मला मिळालेला सर्वात वाईट सल्ला म्हणजे ब्रेस्ट इम्प्लांट करणं. मी १८ वर्षांची होते आणि त्यावेळी मला कुणीतरी हा सल्ला दिला होता. पण, मला अनेकदा प्रश्न पडतो की तो सल्ला गांभीर्याने न घेण्याइतकी समजूतदार मी इतक्या कमी वयात कशी होती?” असं दीपिका म्हणाली.
दरम्यान, दीपिकाने २००७ मध्ये फराह खान दिग्दर्शित ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यावेळी दीपिका २१ वर्षांची होती. नंतर तिने ‘ये जवानी है दिवानी’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘हॅपी न्यू इयर’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’, ‘गेहराइयां’ आणि ‘पठाण’ अशा अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. सध्या ती तिच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे.