scorecardresearch

“पतीने सतीश कौशिक यांची हत्या केली” म्हणणाऱ्या व्यावसायिकाच्या पत्नीला पोलिसांची नोटीस

फार्म हाऊसचा मालक विकास मालूनेचे सतीश कौशिक यांचा खून केल्याचं त्याची पत्नी सान्वी मालूने केला होता.

satish-kaushik
(फोटो – संग्रहित)

अभिनेते सतीश कौशिक यांचं ९ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. डॉक्टरांनीही त्यांच्या मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं म्हटलं होतं. पण, ज्या होळी पार्टीत हजेरी लावल्यानंतर सतीश कौशिक यांचं निधन झालं होतं, त्या फार्म हाऊसच्या मालकावर त्याच्याच पत्नीने आरोप केले होते. फार्म हाऊसचा मालक विकास मालूनेचे सतीश कौशिक यांचा खून केल्याचं त्याची पत्नी सान्वी मालूने केला होता.

“लग्नानंतर त्याचा मुलगाही…” सतीश कौशिक यांच्या खुनाचा दावा करणाऱ्या महिलेचे पतीवर बलात्काराचे आरोप

सान्वी पती विकास मालू सतीश कौशिक यांच्यापासून सुटका मिळवण्यासाठी हत्येचा कट रचत असल्याचा आरोप सान्वीने केला होता. विकासने कौशिककडून १५ कोटी रुपये उसने घेतले होते आणि ते परत करायचे नव्हते, म्हणून त्याने सतीश कौशिक यांची हत्या केल्याचा आरोप तिने केला होता. याप्रकरणी आता दिल्ली पोलिसांनी सान्वीला नोटीस पाठवली आहे.

“तुम्हाला लाज…” Oscar 2023 च्या होस्टने ‘आरआरआर’ला ‘बॉलिवूड चित्रपट’ म्हटल्याने संतापले नेटकरी

दिल्ली पोलीस सध्या अभिनेते सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी सतीश कौशिक यांचा मित्र विकास मालूची दुसरी पत्नी सान्वी हिला पुन्हा चौकशीत सहभागी होण्यासाठी नोटीस पाठवली आहे. दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांनी सान्वीला चौकशीसाठी बोलावले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-03-2023 at 14:57 IST