महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर कायम सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. त्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. रिल्स व्हिडीओ, फोटो, गाणी याबरोबरच त्या अनेक सामाजिक विषयांवर आपलं मत मांडताना दिसतात. सध्या त्यांचा एक रिल्स व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

अमृता फडणवीस यांनी नुकताच त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातील ‘व्हॉट झुमका’ या गाण्यावर त्या गाडीत बसून डान्स करताना दिसत आहेत. “ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर थोडंसं मनोरंजन…” असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.

हेही वाचा : “यंदाचा वर्ल्डकप…”, ‘टायगर ३’ चित्रपटाच्या कार्यक्रमात सलमान खानचे भाकित, म्हणाला…

अमृता फडणवीस यांनी वाहतूक कोंडीत वेळ घालवण्यासाठी “व्हॉट झुमका…” या ट्रेंडिग गाण्यावर व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओत त्यांनी काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून “व्हॉट झुमका…” गाण्याला साजेसे असे मोठे गोलाकार कानातले घातले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओला एका दिवसात ७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. परंतु, त्याच्या या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : पुण्यातील नव्या हॉटेलनंतर ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री लवकरच सुरू करणार नवा व्यवसाय, खुलासा करत म्हणाली…

amruta
अमृता फडणवीस

अमृता यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी “हे असलं गरजेचं आहे का?”, “कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा…”, “ही पोस्ट डिलिट करा अमृता ताई” अशा कमेंट्स करत नाराजी व्यक्त केली आहे. पण, दुसरीकडे त्यांच्या चाहत्यांना हा व्हिडीओ आवडलेला आहे. “त्यांना स्वातंत्र्य आहे… त्या काहीही चुकीचं करत नाहीत” अशा कमेंट्स करत अमृता यांच्या चाहत्यांनी त्यांचं समर्थन केलं आहे.

Story img Loader