Bollywood Actor Green Flag Image Affair Tanya Puri : बॉलीवूडच्या झगमगाटामागे लपलेले एक अत्यंत धक्कादायक आणि काळे वास्तव प्रसिद्ध महिला गुप्तहेर तान्या पुरीने उघडकीस आणले आहे. ‘द ट्रेटर्स २’ फेम तान्या पुरी हिने एका पॉडकास्टमध्ये खुलासा केला की, ज्या अभिनेत्याला संपूर्ण देश ‘ग्रीन फ्लॅग’, आदर्श पती आणि फॅमिली मॅन मानतो, त्याचे प्रत्यक्षात अर्ध्या वयाच्या मुलींशी संबंध आहेत. या अभिनेत्याच्या पत्नीनेच संशयावरून तान्याकडे तक्रार केली होती. तपासादरम्यान या जोडप्यात कसलेही शारीरिक संबंध नसून केवळ इंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी आणि लोकांसमोर चांगली प्रतिमा टिकवण्यासाठी ते एकत्र राहत असल्याचे समोर आले आहे.

तान्या पुरी ही एक प्रायव्हेट महिला गुप्तहेर आहे. तिचे वडीलही गुप्तहेर आहेत. तान्याला तिच्या वडिलांकडूनच ट्रेनिंग मिळालंय. तान्या लग्नानंतर जोडीदारांचे अफेअर आणि बॅकग्राउंड व्हेरिफिकेशन अशा प्रकरणांचा तपास करते. तान्या पुरीने पॉडकास्टमध्ये सांगितलेल्या एका धक्कादायक प्रकरणाची सध्या खूपच चर्चा होत आहे. तान्याने अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींसाठीही काम केलं आहे.

बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीने दिलेलं काम

तान्या पुरी करण जोहरच्या द ट्रेटर्स २ मध्ये स्पर्धक म्हणून दिसणार आहे. या शोआधी एका पॉडकास्टमध्ये तिने बॉलीवूड अभिनेत्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. त्याचे अनेक कमी वयाच्या मुलीबरोबर संबंध आहेत. जाहरा जानीशी बोलताना तान्याने सांगितलं की एक लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता आहे. त्याला लोक ‘ग्रीन फ्लॅग’ म्हणतात, आदर्श मानतात. त्याला मुलं देखील आहेत. त्या अभिनेत्याची पत्नी तान्याकडे आली होती. पतीचं अफेअर आहे का? हे तिला जाणून घ्यायचं होतं.

आदर्श प्रतिमा असलेला बॉलीवूड अभिनेता

तान्या पुरी म्हणाली, “मी एका केसबद्दल सांगते. एक अत्यंत आदर्श प्रतिमा असलेला बॉलीवूड अभिनेता आहे. तो खूप चांगला बाबा आणि फॅमिली मॅन म्हणून ओळखला जातो. एकदा त्याच्या पत्नीने आमच्या कंपनीशी संपर्क साधला. आम्ही तपास केला तेव्हा समजले की तो एका विशिष्ट प्रकारच्या फ्रँचायझी चित्रपटांमध्ये काम करतो. कामाच्या निमित्ताने तो आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलींच्या संपर्कात असायचा. प्रत्यक्षातही त्याचे अनेक मुलींशी संबंध होते, असंही तपासात उघड झालं.”

तान्याने खुलासा केला की, त्याचे पत्नीबरोबर कोणतेही संबंध नव्हते. दोघे एकत्र झोपतसुद्धा नव्हते. त्यांना दोन मुलं होती आणि एका-एका मुलाची काळजी घेण्यासाठी दोघे वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपायचे. त्यांच्यात कसलेही शारीरिक संबंध नव्हते.

तान्या पुरीने बॉलीवूडमधील धक्कादायक वास्तवही सांगितली. सेलिब्रिटींसाठी नातं तोडणं सोपं नसतं. पत्नीला पतीच्या अफेअरबद्दल माहिती असूनही त्यांची लोकांमधील प्रतिमा चांगली राहावी, यासाठी त्या नातं तोडू शकत नाही, असं तान्याने नमूद केलं.