Dhamaal 4 Film X Review : बॉलिवूडचा बहुप्रतिक्षित आणि लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझीचा ‘धमाल ४’ हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अजय देवगण, महाराष्ट्राचा लाडका रितेश देशमुख, अर्शद वारसी आणि जावेद जाफरी यांच्या तगड्या स्टारकास्टने जुन्या आठवणी ताज्या केल्या असल्या तरी सोशल मीडियावरील एक्सवरील रिव्ह्यूज पाहता प्रेक्षकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाबाबत लोकांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. काहींना चित्रपटात कॉमेडीचा तडका पाहायला मिळाला, तर काहींना यामध्ये त्रुटीही जाणवल्या. या चित्रपटाबाबत लोकांची मतं वेगवेगळी दिसत आहेत.
जिथे अनेक प्रेक्षकांना मूळ स्टारकास्टला पुन्हा बघून आनंद झाला आहे, तर काही लोकांनी चित्रपटाचे जोक्स आणि चित्रपटाचे लेखन खूप कमकुवत आहे, असं म्हटलं आहे. धमाल ४ बद्दल एक्सवर युजर्सनी दिलेले रिव्ह्यू जाणून घेऊयात.
‘धुरंधर’नंतर बॉलीवूडचा किती डाउनफॉल झालाय
आदित्य धरसारखे निर्माते ‘धुरंधर’सारखे चित्रपट बनवून भारताचा गौरव वाढवत आहेत. पण त्याच वेळी अजय आणि अक्षयसारखे बॉलीवूडमधील काही अभिनेते मात्र अजूनही प्रेक्षकांना मूर्ख बनवण्यातच मग्न आहेत. धमाल ४, अशी पोस्ट एका युजरने केली आहे.
धमाल ४ आपल्या नावाप्रमाणेच धमाल चित्रपट आहे. चित्रपटाच्या पूर्वार्धात खळखळून हसवणारे सीन आहेत, तर याचा उत्तरार्धदेखील उत्तम आहे आणि क्लायमॅक्समध्ये भावनांचा तडका पाहायला मिळतो. यात लॉजिक शोधू नका – हा चित्रपट म्हणजे तणाव दूर करणारा आहे, असं तरण आदर्श यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिलंय.
रेटिंग: १.५/५
धमाल ४ हा अत्यंत सुमार चित्रपट आहे.
एका लोकप्रिय फ्रँचायझीमधील हा सर्वात कमकुवत चित्रपट असून तो जवळपास सर्वच बाबतीत अपयशी ठरला आहे. यातील मुख्य समस्या म्हणजे हा चित्रपट मनोरंजनच करत नाही. यात विनोदही नाही. काही मोजके विनोदी सीन वगळता, हा चित्रपट पूर्णपणे निराशाजनक आहे, असं एका युजरने लिहिलंय.
“हा चित्रपट पूर्णपणे कंटाळवाणा आहे. प्रत्येकजण अक्षय कुमार असू शकत नाही, कारण अक्षय कुमार अगदी फालतू विनोदही अशा प्रकारे सादर करतो की त्यावर हसायला येतं. चित्रपटात असे काही सीन होते जे आणखी प्रभावी ठरू शकले असते, परंतु सादरीकरण व अभिनय चांगलं नसल्याने ते झालं नाही. संजय मिश्रा यांचा अभिनय दिलासादायक आहे आणि काही विनोद ऐकून हसायला येतं. टियर-२ आणि टियर-३ शहरांमधील मुलांना हा चित्रपट कदाचित आवडेल, पण मोठ्यांसाठी यात फारसं काही नाही,” अशी पोस्ट एका युजरने केली आहे.
चित्रपटात इतका गोंधळ आहेत की मुलंही कंटाळलेत, अशी पोस्ट एका युजरने केली आहे.
