Re-Released Movies Of 2025 : २०२५ हे वर्ष जवळपास संपायला आलं आहे. या वर्षात विविध कथानक असलेले वेगळ्या जॉनरचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. महत्त्वाचं म्हणजे या वर्षी अनेक चित्रपट पुन्हा प्रदर्शित झालेत. चला तर जाणून घेऊयात या वर्षी पुन्हा प्रदर्शित झालेले चित्रपट कोणते आणि त्यांनी किती कमाई केली…

२०२५ मध्ये ‘सनम तेरी कसम’, ‘बाहुबली’ ते ‘शोले’ असे काही चित्रपट प्रदर्शित झाले आणि त्यांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाईसुद्धा केली. चला तर जाणून घेऊयात या चित्रपटांबद्दल. या यादीतील पहिला चित्रपट आहे ‘सनम तेरी कसम’.

२०२५मध्ये पुन्हा प्रदर्शित झालेले ‘हे’ चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

सनम तेरी कसम – बॉलीवूड अभिनेता हर्षवर्धन राणेची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट पहिल्यांदा ५ फेब्रवारी २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला. परंतु, त्यावेळी या चित्रपटाला फार चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यानंतर हा चित्रपट पुन्हा ७ फेब्रवारी २०२५ मध्ये प्रदर्शित झाला आणि ‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार यावेळी या चित्रपटाने ३९.१५ कोटींची कमाई केली.

बाहुबली – लोकप्रिय दाक्षिणात्य दिग्दर्शक राजामौली यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘बाहुबली’ चित्रपटात अभिनेता प्रभास मुख्य भूमिकेत झळकलेला. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळालेला. तर हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाला तेव्हा या चित्रपटाने ३७ कोटींची कमाई केली.

यह जवानी हैं दिवानी – रणबीर कपूर व दीपिका पादुकोण यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट सिनेमागृहात पहिल्यांदा प्रदर्शित झाला तेव्हा याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळालेला; तर आजही या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. हा चित्रपट ३ जानेवारी २०२५ मध्ये पुन्हा प्रदर्शित झालेला. यावेळी या चित्रपटाने २५.४ कोटींची कमाई केलेली.

शोले – ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी व जया बच्चन यांचा ‘शोले’ हा चित्रपट बॉलीवूडमधील गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२५ मध्ये पुन्हा प्रदर्शित झालेला. तर यावेळी या चित्रपटाने १३ कोटींची कमाई केली.