‘शोले’, ‘सीता और गीता’, ‘धर्मवीर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचा आज वाढदिवस. धर्मेंद्र आज ८७ वर्षांचे झाले आहेत. त्यानिमित्ताने अनेक कलाकारांनी त्यांना सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत. एकेकाळी त्यांच्या अभिनय कारकिर्दीपासून ते लूकपर्यंत सर्वच गोष्टींचे लोक दिवाने होते. अर्थात अभिनय कारकिर्दीबरोबरच धर्मेंद्र यांचं खासगी आयुष्यही बरंच चर्चेत राहिलं होतं. खासकरून विवाहित असूनही त्यांचं हेमा मालिनी यांच्याशी अफेअर ते लग्न बरंच गाजलं. त्यांच्या या लग्नाला हेमा मालिनी यांच्या वडिलांचा मात्र प्रचंड विरोध होता.

धर्मेंद्र यांचं प्रकाश कौर यांच्याशी अगोदरच लग्न झालं होतं त्यांना सनी, बॉबी, विजेता आणि अजेता अशी चार मुलं होती. पण विवाहित असूनही धर्मेंद्र हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले. या दोघांचं अफेअर त्या काळात बरंच चर्चेत होतं. पण जेव्हा धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्या लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अभिनेत्रीच्या वडिलांनी मात्र याला विरोध केला. या दोघांच्या नात्यावर ते खूपच नाराज होते. आपल्या मुलीने धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी होणं त्यांना अजिबात मान्य नव्हतं. या सगळ्यात धर्मेंद्र यांना एकदा हेमा यांच्या वडिलाच्या रागाचा सामना करावा लागला होता.

rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
Sharmila Pawar
अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी आता सुप्रिया सुळेंच्या प्रचारात; म्हणाल्या, “आपल्या माहेरवाशिणीला…”

आणखी वाचा- “धर्मेंद्रच सिनियर बाकी अमिताभ…” इंडस्ट्रीमधील अनुभवावर सचिन पिळगावकरांनी केलं भाष्य

हेमा मालिनी यांच्या आयुष्यावर आधारित ‘हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल’ या पुस्तकात धर्मेंद्र यांच्याबरोबर अभिनेत्रीच्या आई- वडिलांचे संबंध कसे होते याचा खुलासा करण्यात आला आहे. हेमा मालिनी यांचे आई-वडील या नात्याच्या कायम विरोधात होते कारण धर्मेंद्र आधीच विवाहित होते. हेमा मालिनीने जितेंद्र यांच्याशी लग्न करावं असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी त्यासाठी हेमा यांना तयारही केलं होतं. पण धर्मेंद्र यांनी हे लग्न होऊ दिलं नाही. जेव्हा हेमा आणि जितेंद्र यांचं गुपचूप लग्न केलं जात होतं तेव्हा दारुच्या नशेत धर्मेंद्र यांनी खूप गोंधळ घातला होता. ज्यामुळे मोठा वाद झाला.

आणखी वाचा- काम मिळत नव्हते म्हणून वैतागून धर्मेंद्र यांनी घेतलेला ‘हा’ मोठा निर्णय, पण…

एका मीडिया रिपोर्टनुसार या सगळ्या वादात हेमा मालिनी यांच्या वडिलांना राग अनावर झाला आणि त्यांनी रागाच्या भरात धर्मेंद्र यांची कॉलर पकडून त्यांना धक्का दिला होता. पण धर्मेंद्र हेमा मालिनी यांच्या प्रेमात एवढे बुडाले होते की त्यांनी मागे न हटणार नाही असं मनोमन ठरवूनच टाकलं होतं. त्यामुळे एवढं सगळं झाल्यानंतर हेमा यांच्या कुटुंबियांनी अखेर धर्मेंद्र यांच्या हट्टा पुढे हार मानली. पण लग्न करण्यासाठी धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट देणं गरजेच होतं आणि प्रकाश कौर यांनी घटस्फोटाला नकार दिला. अशात धर्मपरिवर्तन करून लग्न करणं हा एकच उपाय धर्मेंद्र यांच्याकडे राहिला होता. अखेर १९८० मध्ये धर्मेंद्र यांनी मुस्लीम धर्म स्वीकारत हेमा मालिनी यांच्याशी लग्न केलं.

हेमा मालिनी यांच्या ‘हेमा मालिनी : बियॉन्ड द ड्रीम गर्ल’ पुस्तकात उल्लेख आहे की, हेमा मालिनी यांचे वडील अखेरपर्यंत मुलीच्या लग्नाच्या विरोधात होते. पण जितेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाच्या वेळी झालेल्या वादानंतर हेमा मालिनी यांच्या वडिलांचं हे दुर्घटनेत निधन झालं आणि वडिलांच्या निधनानंतरच हेमा यांनी धर्मेंद्र यांच्याशी लग्न केलं.