Dharmendra Birthday Speial : आज अभिनेते धर्मेंद्र यांचा ८७वा वाढदिवस. ६०च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीमध्ये धर्मेंद्र यांचं नाव टॉपला होतं. त्यांनी चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान अमुल्य आहे. अनेक सुपरहिट चित्रपट धर्मेंद्र यांच्या नावे आहेत. परंतु तसं जरी असलं तरी त्यांना हिंदी सिनेसृष्टीत काम करताना सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष करावा लागला होता. एक वेळ अशी आली होती की त्यांनी गावाला परत जाण्याचा निर्णय घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धर्मेंद्र हे मूळचे पंजाबचे. तिथून ते मुंबईत नशीब आजमावण्यासाठी आले. तेव्हा त्यांची भेट मनोज कुमार यांच्याशी झाली. दोघेही एकाच क्षेत्रात काम करत असल्याने त्यांच्यात घट्ट मैत्री झाली. एका मीडिया रीपोर्टनुसार, ज्या चित्रपटासाठी धर्मेंद्र पंजाबहून मुंबईत आले, तो चित्रपट कधीच तयार होऊ शकला नाही. यादरम्यान त्यांना बऱ्याच कठीण काळातून जावं लागलं. तेव्हा त्यांना काहीच काम मिळालं नाही. त्यांना दोन वेळच्या जेवणाची सोय करणंही कठीण जाऊ लागलं. अखेर त्यांनी गावी परतण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा : “अरे काय हे..!”, आमिर खानला पाहून चाहते निराश

एक दिवस निराश होऊन धर्मेंद्र स्टेशनवर पोहोचले आणि ट्रेनमध्ये बसले. ही गोष्ट मनोज कुमार यांना समजली. त्यांनी लगेच स्टेशन गाठलं आणि धर्मेंद्रला ट्रेनमधून उतरवलं. त्यांनी धर्मेंद्र यांची समजूत काढली. त्यांना लवकरच काम मिळेल अशी आशा दाखवली.

हेही वाचा : वडिलांना देव मानणारा सनी देओल सावत्र बहिणीचं तोंडही पाहणं पसंत करत नाही, कारण…

१९६० मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटाद्वारे धर्मेंद्र यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. आता अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारत गेली अनेक वर्ष ते प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dharmendra deol had taken strong decision when he didnt getting film rnv
First published on: 08-12-2022 at 14:01 IST