Dharmendra News Updates : बॉलीवूडचे ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मुंबईतील विलेपार्लेच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संपूर्ण देओल कुटुंबीय आणि बॉलीवूडचे काही कलाकार उपस्थित होते. धर्मेंद्र यांनी गेली अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांचा ‘इक्किस’ हा शेवटचा चित्रपट येत्या २५ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण बॉलीवूड कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

Live Updates

Dharmendra Death News Updates:

20:09 (IST) 24 Nov 2025

Dharmendra : अभिनेते धर्मेंद्र यांचे मावळातील औंढे गावच्या ग्रामस्थांशी होते अनोखे नाते; १०० एकरवर…

१९८५ पासून औंढे गाव मावळ तालुक्याच्या नकाशावर मोठ्या प्रमाणावर चर्चेला आले. त्याचे कारण म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांनी औंढे गावातील शंभर एकर शेतजमीन विकत घेतली. ...वाचा सविस्तर
18:03 (IST) 24 Nov 2025

धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी पोहोचली शिल्पा शेट्टी

https://www.instagram.com/p/DRcGZlJjNl4/?hl=en

18:00 (IST) 24 Nov 2025

Dharmendra News Updates: अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन; बॉलीवूड कलाकारांनी दिला अखेरचा निरोप

https://www.instagram.com/p/DRcA1QOjJHj/?hl=en

17:25 (IST) 24 Nov 2025

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर माधुरी दीक्षितची भावुक पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली…

Madhuri Dixit shared an emotional post After Dharmendras death: धर्मेंद्र आणि माधुरी दीक्षित यांनी 'या' चित्रपटांत केले आहे एकत्र काम; अभिनेत्री म्हणाली… ...सविस्तर वाचा
16:54 (IST) 24 Nov 2025

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर क्षिती जोगची भावुक प्रतिक्रिया; लोकप्रिय बॉलीवूड सिनेमात केलंय एकत्र काम; म्हणाली, "खूपच वाईट…"

Kshitee Jog Reaction : धर्मेंद्र यांच्या निधनानंतर क्षितीची भावनिक प्रतिक्रिया समोर, एकत्र केलेल्या कामाबद्दलची जुनी आठवण केली शेअर ...सविस्तर वाचा
16:29 (IST) 24 Nov 2025
धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सायरा बानू पोहोचल्या

"मी काय बोलू खूप आठवणी आहेत...ते खूप चांगले व्यक्ती होते. त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही खरं सांगायचं तर असा माणूस पुन्हा होणे नाही. दिलीप साहेबांना ते धाकट्या भावाप्रमाणे होते आणि ते सुद्धा दिलीपजींना आपला मोठा भाऊ मानायचे. धर्मेंद्रजी कायम आमच्या स्मरणात राहतील." - सायला बानू

https://www.instagram.com/p/DRb5uhgk93j/

16:17 (IST) 24 Nov 2025
बच्चू कडूचे हेमामालिनींबाबत वाईट शब्द... त्यावेळी अभिनेते धर्मेंद्रचा संताप... म्हणाले...

हेमामालिनी यांच्याकडून बच्चू कडूंना न्यायालयात ओढण्याची धमकी दिली गेली होती. तर बऱ्याच अभिनेते व अभिनेत्रींनी बच्चू कडू यांच्याबाबत संताप व्यक्त केला होता. ...वाचा सविस्तर

16:00 (IST) 24 Nov 2025

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

धर्मेंद्र यांच्या आठवणीत राज ठाकरेंची पोस्ट

https://twitter.com/RajThackeray/status/1992887455343583453

16:00 (IST) 24 Nov 2025

बॉलीवूडचा हि-मॅन काळाच्या पडद्याआड, 'अशी' होती धर्मेंद्र यांची फिल्मी कारकीर्द; ३०० हून अधिक सिनेमांत केलंय काम

Dharmendra Dies at 89 : ‘सत्यकाम’ ‘शोले’, ‘हत्यार’, ‘जुगनू’ 'फूल और पत्थर' या आणि अशा अनेक गाजलेल्या सिनेमांमधील भूमिका अजरामर करणाऱ्या धर्मेंद्र यांचं निधन ...सविस्तर वाचा
15:45 (IST) 24 Nov 2025

"मला त्यांच्याबरोबर…", धर्मेंद्र यांच्याबरोबरचे फोटो शेअर करत सचिन पिळगांवकरांनी व्यक्त केल्या भावना

Sachin Pilgaonkar on Dharmendra: सचिन पिळगांवकर यांनी धर्मेंद्र यांना वाहिली श्रद्धांजली; म्हणाले, "त्यांचा वारसा..." ...अधिक वाचा
15:26 (IST) 24 Nov 2025

संजय दत्तने धर्मेंद्र यांना वाहिली श्रद्धांजली

संजय दत्तने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

https://www.instagram.com/p/DRb1JoiDPTH/?img_index=1&igsh=dXIyZGI2aXByMXc5

15:24 (IST) 24 Nov 2025

Dharmendra Death News LIVE Updates: रणवीर सिंह व दीपिका पादुकोण स्मशानभूमीत दाखल

धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप देण्यासाठी रणवीर सिंह व दीपिका पादुकोण स्मशानभूमीत दाखल

https://www.instagram.com/reel/DRbzoy7jE0d/?igsh=MWoza3E2MDNtMWh4Yg%3D%3D

15:19 (IST) 24 Nov 2025

Dharmendra : हि-मॅन’ची एक्झिट चटका लावणारी, चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा तारा निखळला - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अभिनेते धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली

स्वप्नाळू, युवा नायक ते तडफदार-बलंदड नायक म्हणून साकारलेल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि पुढे बॉलिवुडचा हि-मॅन म्हणून लौकीक मिळवेलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र चित्रपट रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हटले आहे. ...वाचा सविस्तर
15:16 (IST) 24 Nov 2025

Dharmendra Death News LIVE Updates: कॉमेडियन कपिल शर्माची भावुक पोस्ट

कपिल शर्माने धर्मेंद्र यांना वाहिली श्रद्धांजली

https://www.instagram.com/p/DRbx_qwDA7v/?igsh=MXBuZGcweGUxZnBuMg%3D%3D

15:12 (IST) 24 Nov 2025

Dharmendra : अभिनेते धर्मेंद्र यांच्या आठवणीत अक्षय कुमारची पोस्ट

"हिरो व्हायचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक मुलासाठी धर्मेंद्रजी आदर्श होते. ते आमच्या इंडस्ट्रीचे ही-मॅन होते. तुमच्या भूमिका आणि चित्रपटांमधून तुम्ही आमच्या सदैव स्मरणात राहाल." - अक्षय कुमारने धर्मेंद्र यांना वाहिली श्रद्धांजली

15:07 (IST) 24 Nov 2025

Dharmendra dies at 89: धर्मेंद्र यांची 'ती' पोस्ट ठरली शेवटची; म्हणालेले…

Dharmendra Passes Away: धर्मेंद्र यांनी ७ आठवड्यांपूर्वी शेअर केली होती 'ही' पोस्ट; पाहा... ...वाचा सविस्तर
15:03 (IST) 24 Nov 2025

Dharmendra : धरम पाजींची विदर्भातील वाघ बघण्याची इच्छा अपूर्ण... अमिताभ बच्चन पेंचमध्ये आले असतांना...

Actor Dharmendra Passes Away : धर्मेंद्र यांच्या निधनाने त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली आहे. ...वाचा सविस्तर
14:57 (IST) 24 Nov 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धर्मेंद्र यांना वाहिली श्रद्धांजली

PM Modi condoles death of Bollywood actor Dharmendra : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनेते धर्मेंद्र यांना वाहिली श्रद्धांजली

"धर्मेंद्रजी यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकांनी चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. धर्मेंद्रजींचा स्वभाव, त्यांचा साधेपणा, त्यांच्यातील नम्रता कायम स्मरणात राहील. या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबासह माझ्या संवेदना आहेत. ओम शांती!"

https://twitter.com/narendramodi/status/1992884677124690030

14:41 (IST) 24 Nov 2025

Dharmendra Health Update Live : सलमान व शाहरुख खान पवन हंस स्मशानभूमीजवळ दाखल, अन्य कलाकारही उपस्थित

https://www.instagram.com/p/DRbuy2cjN3n/?hl=en

14:33 (IST) 24 Nov 2025

Dharmendra Latest Update: अजय देवगणची धर्मेंद्र यांच्यासाठी पोस्ट

14:25 (IST) 24 Nov 2025

आमिर खान, हेमा मालिनी, अभिषेक व अमिताभ बच्चन, निर्माते अनिल शर्मा, सलीम खान हे कलाकार विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत पोहोचले आहेत. मात्र, अद्याप देओल कुटुंबाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

https://www.instagram.com/p/DRbsNFhjMvL/?hl=en

14:23 (IST) 24 Nov 2025

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन पोहोचले विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत

अमिताभ बच्चन विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत पोहोचले आहेत. याठिकाणी देओल कुटुंबीय आधीच उपस्थित आहेत.

https://www.instagram.com/p/DRbpmU5DK2D/?hl=en

दरम्यान, धर्मेंद्र यांच्याबद्दल सांगायचं झालं, तर पंजाबमधील लुधियाना येथील एका गावात धर्मेंद्र केवल कृष्ण देओल यांचा जन्म झाला होता. त्यांनी १९५४ मध्ये म्हणजेच वयाच्या १९ व्या वर्षी प्रकाश कौर यांच्याशी पहिलं लग्न केलं. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. नंतर विवाहित असतानाच धर्मेंद्र हे अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले. प्रकाश कौर यांना घटस्फोट न देता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं.