‘गदर २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. हा सनी देओलचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अवघ्या तीन दिवसात चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. सनीच्या चित्रपटाचं त्याच्या भावंडांनाही कौतुक आहे. सनी देओलची सावत्र बहीण इशाने गदर २ चं स्पेशल स्क्रीनिंग ठेवलं आणि या स्क्रीनिंगला बॉबी व सनी देओलने हजेरी लावली.

‘गदर २’चा बॉक्स ऑफिसवर जलवा! पहिल्या दोन दिवसांपेक्षा तिसऱ्या दिवशी तुफान कमाई, ‘बाहुबली’चा रेकॉर्ड मोडला

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

करण देओलच्या लग्नात सनी देओलच्या सावत्र बहिणी इशा देओल आणि अहाना देओलच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्यातील मतभेदाच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, इशा देओलने तिच्या भावाच्या चित्रपटाच्या समर्थनार्थ पोस्ट करून त्या अफवा असल्याचे सिद्ध केलं होतं. अशात आता इशाने चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंगही ठेवलं.

पापाराझींनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, इशा देओलने ठेवलेल्या ‘गदर २’ च्या स्पेशल स्क्रीनिंगमध्ये सनी देओल आणि बॉबी देओलने हजेरी लावली. नंतर हे तिघेही कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसले. इतकंच नाही तर ईशाची बहीण अहानाही मुलाबरोबर तिथे आली होती, तिनेही भावांबरोबर पोज दिल्या. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ही चारही भावंड एकत्र दिसत आहेत.

हा व्हिडीओ शेअर करण्याचा मोह धर्मेंद्र यांना आवरला नाही. त्यांनी आपल्या चारही मुलांचा व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. त्या व्हिडीओवर त्यांनी ‘बहना का अभिमान तू’ हे जुनं हिंदी गाणंही लावलं होतं.

dharmendra post
धर्मेंद्र यांची इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, नेटकरी देखील या व्हिडीओवर कमेंट्स करत आहेत. या चारही भावंडांना पहिल्यांदाच एकत्र पाहिलं. या सर्वांना एकत्र पाहून आनंद झाला, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

Story img Loader