रणवीर सिंहचे अनेक चित्रपट आजपर्यंत गाजले आहेत. २०१० ला प्रदर्शित झालेला बँड बाजा बारात, २०१५ ला प्रदर्शित बाजीराव मस्तानी, २०१८ ला प्रदर्शित झालेला पद्मावत, २०१९ ला प्रदर्शित झालेला गली बॉय तसेच २०२३ ला प्रदर्शित झालेला रॉकी और रानी की प्रेम कहानी हे त्याचे बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेले सिनेमे आहेत.

त्याने त्याच्या कारकि‍र्दीत बॉलीवूडमधील अनेक लोकप्रिय कलाकारांबरोबर काम केले आहे. मात्र, या सगळ्यात २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या धुरंधर या सिनेमाने सर्वात जास्त कमाई केली. फक्त भारतातच नाही तर या सिनेमाने जगभरात मोठ्या प्रमाणात कमाई केली. या सिनेमात बॉलीवूडमधील अनेक लोकप्रिय महत्वाच्या भूमिकेत दिसले. संजय दत्त, राकेश बेदी, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना, सारा अर्जुन असे अनेक महत्वाच्या भूमिकांमध्ये दिसले. धुरंधर सिनेमाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. प्रेक्षकांनी चित्रपट व कलाकारांवर कौतुकाचा वर्षाव केला.

आता १९ मार्च २०२६ ला धुरंधर २ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमालादेखील पहिल्या भागाप्रमाणेच प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. जगभरातील सिनेमांगृहांमध्ये हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत असल्याचे दिसत आहे. हा सिनेमा आतापर्यंत सर्वात जास्त कमाई केलेल्या सिनेमांचे रेकॉर्ड मोडत असल्याचे दिसत आहे.

Award Banner

आता या सिनेमाने १६ व्या दिवशी किती कमाई केली आहे, हे जाणून घेऊ…

धुरंधर २ ने १६ व्या दिवशी २१. ५५ कोटींची कमाई केली आहे. सॅल्कनिकनुसार, या कमाईसह धुरंधर २ ने भारतात ९५९. ३७ कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात १५२३.५८ कोटींची कमाई केली आहे. धुरंधरने कमी कालावधीत जगभरातील कमाईचा हा टप्पा गाठला आहे.

चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने सर्वाधिक कमाई करत १२, २९१ शोमधून २०.२५ कोटींची कमाई केली. तमिळ आवृत्तीने ३४८ शोमधून ४५ लाख रुपयांची कमाई केली. तेलुगू आवृत्तीनेही स्थिर कामगिरी करत 504 शोमधून ६५ लाखांची कमाई केली आहे.

आता १५२३ कोटींचा टप्पा गाठत हा सिनेमा दंगल, बाहुबली २:द कन्लूजन, पुष्पा२: द रूल या सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.

आता आगामी काळात हा सिनेमा आणखी किती कमाई करणार, तसेच कोणते नवीन रेकॉर्ड तयार करणार हे पाहणे महत्वाचे ठरले आहे.