Dhurandhar Fame Rakesh Bedi Talks About Kangana Ranaut : आदित्य धर लिखित व दिग्दर्शित ‘धुरंधर २’ची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. बॉलीवूड ते दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील अनेक कलाकार चित्रपटाचं कौतुक करत आहे. बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाची जबरदस्त सुरुवात झाली आहे. अशातच आता ‘धुरंधर’मधील अभिनेते राकेश बेदी यांनी ‘धुरंधर २’ची तुलना कंगणा रणौतच्या ‘इमर्जन्सी’बरोबर केली आहे
रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ने सुरुवातीच्या दोन दिवसांतच कोट्यवधींची कमाई केली. यामुळे आता राकेश बेदी यांनी कंगना रणौतच्या चित्रपटाशी तुलना करत तिला टोला लगावला आहे. राकेश बेदी कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाबद्दल नेमकं काय म्हणाले याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
राकेश बेदी काय म्हणाले?
‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार राकेश बेदी एका मुलाखतीत कंगणा रणौतच्या ‘इमर्जन्सी’द्दल म्हणाले, “अलीकडेच आलेले इंदिरा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित चित्रपट दोन दिवससुद्धा चालले नाही. ‘धुरंधर’चं लिखाण, पटकथा उत्तम आहे. लोकांनी इतका मोठा सिनेमा यापूर्वी पाहिला नव्हता.”
‘धुरंधर २’ला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल राकेश म्हणाले, “हे अपेक्षितच होतं आणि आता तसा प्रतिसादही मिळत आहे. सगळे चित्रपटाबद्दल भरभरून बोलत आहेत. दिवसभर चित्रपटाचे असंख्य शो सुरू आहेत. मी माझ्या कारकिर्दीत इतकी क्रेझ कधीच पाहिली नव्हती.”
राकेश यांना ‘धुरंधर’ चित्रपट प्रोपगंडा आहे का असं विचारल्यानंतर ते म्हणाले, “एखादा चित्रपट बघून तो आवडला की नाही हे सांगण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे. पण, एखाद्या चित्रपटाला विशिष्ट चौकटीत अडवकणं योग्य नाही. शेवटी अंतिम निष्कर्ष हाच आहे की लोकांना हा चित्रपट आवडत आहे.”
‘धुरंधर २’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?
‘धुरंधर २’ १९ मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि ‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार या चित्रपटानं पहिल्याच दिवशी १०० कोटींहून अधिक कमाई केली. पहिल्या दिवशी चित्रपटानं एकूण १०२.५५ कोटींचा गल्ला जमावला. तर दुसऱ्या दिवशी आतापर्यंत या चित्रपटानं ६६.९५ कोटींची कमाई केली आहे. ‘धुरंधर २’ला मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू आणि पुणे या शहरांमधून अधिक प्रतिसाद मिळत आहे.
