Dhurandhar 2 Collection Crosses 500 Crore Mark Globally : सध्या संपूर्ण देशभरात आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ अर्थात धुरंधरच्या दुसऱ्या भागाची चर्चा सुरू आहे. या सिनेमाने अवघ्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी करत इतिहास रचला आहे. बॉलीवूडप्रेमींसह लोकप्रिय कलाकार, दिग्दर्शक सगळेच ‘धुरंधर’चं भरभरून कौतुक करत आहेत. या सिनेमाच्या कमाईत शनिवारी मोठी वाढ झाली असून जगभरात या चित्रपटाने ५०० कोटींचा आकडा पार केल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे.

‘धुरंधर: द रिव्हेंज’ चित्रपटाने ५०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली आहे. या सिनेमाची परदेशातील कमाई जवळपास ९६.५० कोटी ( Gross ) आहे. तर, भारतीय बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने ३३९.२७ कोटींचं नेट कलेक्शन केलं आहे.

शनिवारी तिसऱ्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवशी १९ मार्चला या सिनेमाने १०२.५५ कोटींचा गल्ला जमावला. यानंतर दुसऱ्या दिवशी ‘धुरंधर २’ने ८०.७२ कोटी कमावले. तर, शनिवारी तिसऱ्या दिवशी या सिनेमाने तब्बल ११३ कोटींचा गल्ला जमावला आहे.

Award Banner

‘धुरंधर: द रिव्हेंज’ चित्रपटाची भारतातील कमाई

  • बुधवार ( पेड प्रिव्ह्यू ) – ४३ कोटी
  • गुरुवार ( १९ मार्च ) – १०२.५५ कोटी
  • शुक्रवार ( २० मार्च ) – ८०.७२ कोटी
  • शनिवार ( २१ मार्च ) – ११३ कोटी
  • एकूण – ३३९.२७ कोटी ( नेट कलेक्शन ) / ४०५ कोटी ( Gross )
  • जगभरात कमाई – ९६.५० कोटी
  • भारतासह जगभरातील कलेक्शन – ५०१.०४ कोटी

‘धुरंधर २’ रविवारी चौथ्या दिवशी सुद्धा बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करेल असा अंदाज बांधण्यात येत आहे. या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन आदित्य धरने केलं असून रणवीर सिंहने या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली आहे. यासह या चित्रपटात आर. माधवन, संजय दत्त, अर्जुन रामपाल, राकेश बेदी, दानिश पंडोर आणि सारा अर्जुन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

दरम्यान, आजवर ‘दंगल’ हा एकमेव भारतीय चित्रपट आहे, ज्या चित्रपटाची दोन हजार कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री झालेली आहे. आता ‘धुरंधर २’ सिनेमाची सध्याची वाटचाल पाहता हा सिनेमा लवकरच ऐतिहासिक कामगिरी करत २ हजार कोटींचा गल्ला जमावणार असा अंदाज अनेकांनी बांधला आहे.