Dhurandhar 2 Cast Fees : ‘धुरंधर’ हा २०२५ मधील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. त्यातील सीन, संवाद, गाणी, डान्स स्टेप्स व पात्र सगळंच हिट ठरलं आणि सोशल मीडियावर क्रेझ निर्माण झाली. अशातच आता उद्या १९ मार्च रोजी या चित्रपटाचा दुसरा भाग थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

५ डिसेंबर २०२५ रोजी ‘धुरंधर’ प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाच्या शेवटी १९ मार्च २०२६ मध्ये सीक्वेल प्रदर्शित होणार, असं सांगण्यात आलं होतं. प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केलेली. अशातच आता अखेर चित्रपट प्रदर्शित होणार असून, आधीच अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. ‘धुरंधर’ने जगभरात आणि देशातील बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा व्यवसाय केला आणि अनेक हिट चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले. अशातच आता दुसऱ्या भागाकडूनही तीच अपेक्षा ठेवली जात आहे. ‘धुरंधर २’चं बजेट माध्यमांच्या वृत्तानुसार २७५ कोटी इतकं आहे. तर हा एक मल्टीस्टारर चित्रपट असून, त्यातील कलाकारांनी किती मानधन घेतलं आहे तुम्हाला माहितीये का? चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

रणवीर सिंहचं मानधन किती?

रणवीर सिंह – एशिया नेटच्या अहवालानुसार रणवीर सिंहने ‘धुरंधर २’साठी ५० कोटी रुपये इतकं मानधन घेतलं असल्याचं म्हटलं आहे. तर तो या चित्रपटातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. त्यामध्ये तो हमजा आणि जसकीरत सिंह रंगी या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

संजय दत्ता – संजय दत्त यामध्ये पुन्हा अस्लम चौधरीच्या भूमिकेतून पाहायला मिळणार आहे. तर या चित्रपटासाठी त्याने १० कोटी रुपये मानधन घेतलं आहे. संजय दत्तची सीक्वेलमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.

अर्जुन रामपाल – अर्जुन रामपाल या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेतून झळणार आहे. पहिल्या भागात तो इलियास कश्मिरी या भूमिकेतून झळकलेला. आता सीक्वेलमधूनही पुन्हा तो या भूमिकेतून दिसणार आहे.

सारा अर्जुन – धुरंधरमधून मुख्य नायिका म्हणून सारा अर्जुनने पदार्पण केलं. पहिल्या भागाच्या तुलनेत दुसऱ्या भागात तिची अधिक महत्त्वाची भूमिका असणार आहे, ज्यासाठी तिनं उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार एक कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

आर. माधवन – आर. माधवन या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. त्याने यामध्ये अजय सन्याल ही भूमिका साकारली आहे. त्यानं या चित्रपटासाठी नऊ कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे.

अक्षय खन्ना- रणवीर सिंहनंतर किंबहुना प्रेक्षकांची त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात धुरंधरमधून प्रसिद्धी मिळवणारा अभिनेता म्हणजे अक्षय खन्ना. अक्षयने यामध्ये रहमान डकैत ही भूमिका साकारली आहे. त्यासाठी त्याने २ कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा आहे.