All About Dhurandhar 2 : आदित्य धर लिखित व दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट २०२५च्या शेवटी प्रदर्शित झाला. परंतु, प्रदर्शित झाल्यानंतरच्या दोन महिन्यांनीसुद्धा या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. अशातच आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचीही चर्चा सुरू झालीये. येत्या काळात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच आता याबद्दलची एक बातमी समोर आली आहे.
रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. चित्रपटातील अक्षय खन्नाच्या भूमिकेने तर अनेकांचं लक्ष वेधलं आणि त्याचे रील व संवाद सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. या चित्रपटाने जगभरातही कोट्यवधींची कमाई केली. रणवीर व अक्षय यांच्याव्यतिरिक्त या चित्रपटात बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकले. काही दिवसांपूर्वी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. परंतु, तरीसुद्धा लोक थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहताना दिसले. असं असताना आता लवकरच ‘धुरंधर’चा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘धुरंधर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाच्या शेवटी दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आलेली आणि त्याचवेळी तारीखही जाहीर केलेली. अशातच आता ‘धुरंधर २’ एका महिन्यानंतर प्रदर्शित होण्यास सज्ज असून या चित्रपटाबद्दलच्या काही गोष्टी समोर आल्या आहेत. ‘धुरंधर’चा पहिला भाग हा ३ तास ३६ मिनिटांचा होता, तर पहिल्या भागात भरपूर ॲक्शन, रक्तपात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला, त्यामुळे दुसऱ्या भागातसुद्धा असंच किंवा याहीपेक्षा जास्त रक्तपात आणि ॲक्शन पाहायला मिळेल अशी चर्चा होती.
माध्यमांच्या वृत्तानुसार ‘धुरंधर’चा दुसरा भाग हा पहिल्या भागापेक्षा थोडा छोटा असणार आहे आणि शिवाय यामध्ये ॲक्शन, रक्तपात या गोष्टी कमी प्रमाणात पाहायला मिळेल अशी चर्चा आहे. ‘धुरंधर २’ नेमका कसा असेल याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात… अलीकडेच ‘धुरंधर २’चा टीझर रिलीज झाला, परंतु पहिल्या भागाच्या शेवटी दाखवले गेलेले सीन्सच या टीझरमधून पाहायला मिळाले. ‘धुरंधर २’च्या चर्चा सुरू असताना आता सेन्सॉर बॉर्डाच्या चित्रपटाबद्दलच्य डिटेल्स समोर आल्या आहेत.
‘धुरंधर २’मध्ये झालेत ‘हे’ महत्त्वाचे बदल
‘धुरंधर’चा पहिला भाग ३ तास ३६ मिनिटांचा होता, परंतु याचा दुसरा भाग यापेक्षा थोडा छोटा असणार आहे. ‘धुरंधर २’ तीन तास २८ मिनिटांचा असणार असल्याचं म्हटलं जात आहे; तर यामध्ये सीबीएफसीच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ९ फेब्रुवारीला ‘धुरंधर २’ला सर्टिफिकेट मिळालं आहे. या चित्रपटाला U/A 16+ रेटिंग मिळाली आहे. सेन्सॉर बॉर्डाच्या सर्टिफिकेटनुसार ‘धुरंधर२’मध्ये पहिल्या भागाच्या तुलनेत कमी ॲक्शन आणि रक्तपात पाहायला मिळेल. ‘धुरंधर २’ १९ मार्चला रिलीज होणार आहे.

