Dhurandhar Box Office Collection Day 15: सध्या ‘धुरंधर’ चित्रपटाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. हा चित्रपट भारतातच नाही तर इतर अनेक देशांत या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट सत्य घटनेपासून प्रेरित आहे. या चित्रपटाची कथा, गाणी आणि कलाकारांच्या अभिनयाची सर्व स्तरावर चर्चा सुरू आहे.
बॉक्स ऑफिसवरदेखील हा चित्रपट धुमाकूळ घालत असल्याचे दिसत आहे. ‘धुरंधर’ चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाने १५ दिवसांत किती कमाई केली आहे हे जाणून घेऊ…
धुरंधर’ने १५ दिवसांत जगभरात ‘इतक्या’ कोटींची केली कमाई
‘धुरंधर’ने १५ व्या दिवशी २२.५० कोटींची कमाई केली आहे. यासह चित्रपटाचे एकूण कलेक्शन ४८३ कोटी इतके झाले आहे. सिनेमा लवकरच ५०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणार आहे.
चित्रपटात रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत दिसत आहे. शुक्रवारी या चित्रपटाचे ५०८७ शो संपूर्ण देशभरात होते. तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. जगभरात या चित्रपटाने ७०० कोटींची कमाई केली आहे.
‘धुरंधर’ हा रणवीर सिंगच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा चित्रपट ठरला आहे. १५ वर्षांच्या करिअरमध्ये रणवीर सिंगने अनेक चित्रपटांत काम केले आहे. त्याच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाने भारतात जवळजवळ ५०० कोटींची कमाई केली आहे. तसेच, संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावत’ चित्रपटाने ५०० कोटींचा टप्पा पूर्ण केला होता. ‘धुरंधर’ हा चित्रपट त्याच्या इतर चित्रपटांपेक्षा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरेल.
हा चित्रपट २०२५ चा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरू शकतो. ऋषभ शेट्टी दिग्दर्शित कन्नड ब्लॉकबस्टर ‘कांतारा: द लीजेंड – चॅप्टर १’ने जगभरातील अनेक भाषांमध्ये ८५२.२८ कोटींची कमाई केली होती. तसेच, विकी कौशलच्या छावाने जगभरात ८०७.९१ कोटी रुपयांची कमाई केली होती. आता रणवीर सिंगची प्रमुख भूमिका असलेला धुरंधर या चित्रपटांना कमाईच्या बाबतीत मागे टाकणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, आता आगामी काळात हा चित्रपट किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
