Dhurandhar Fame Gaurav Gira Struggle Story : बॉलीवूड चित्रपटसृष्टीला वेगळे वळण देणाऱ्या ‘धुरंधर’मधील आलम या पात्राला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले. ‘धुरंधर’मध्ये भारतीय गुप्तहेर आणि ज्युस विक्रेत्याची भूमिका प्रेक्षकांना भावली होती. पात्राचा शेवटदेखील मनाला चटका लावणारा होता. मोहम्मद आलम अर्थात आलम भाई ही भूमिका अभिनेता गौरव गेराने साकारली होती. आज त्याच्या भूमिकेचे आणि अभिनयाचे कौतुक होत असले तरी सुरुवातीच्या काळामध्ये त्याने संघर्षमय काळ अनुभवला आहे. बँक खात्यामध्ये केवळ ८४ रुपये असताना अभिनय क्षेत्रामध्ये करिअर करण्याचे ठरवले असल्याचे गौरव गेराने सांगितले आहे.
‘जिस्ट’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेता गौरव गेराने अभिनय क्षेत्रातील अनुभवांबद्दल सांगितले. तसेच कुटुंबातील कोणीच चित्रपटांमध्ये काम न केल्यामुळे या क्षेत्राबाबत कोणालाही काहीही माहिती नव्हते असे गौरवने नमूद केले. गौरव गेरा म्हणाला, “शाळेमध्ये अभ्यासामध्ये नाही तर कलेमध्ये हुशार होतो. मला चित्रकला वैगरे आवडत होती, पण सर्वजण अभ्यास करण्याचा सल्ला देत होते. त्यावेळी वाटत होते, ज्यामध्ये मी चांगला आहे ते करण्यासाठी कोणी प्रोत्साहन देत नाही. पण, अभ्यासामध्ये गती नसताना तो करण्यास सांगितले जात होते. पुढे जाऊन फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला. त्या काळामध्ये सर्वजण हेच करत होते. पण, नंतर अर्धा वर्ष जॉब केल्यानंतर सोडून दिला आणि थिएटरकडे वळल्याचे अभिनेता गौरव गिराने म्हणाला आहे.
बँक अकाऊंटमध्ये केवळ ८४ रुपये
पुढे गौरव गिरा म्हणाला की, माझ्यावर करिअरबाबत कोणतीही जबरदस्ती करण्यात आली नाही. वडिलांची नोकरी होती, त्यामुळे पैशांची काटकसर करावी लागत होती. मुंबईला आल्यानंतर घराच्यांनी पाठवलेले पत्र आजही आहेत. यामध्ये फक्त दोन हजार रुपये मिळतील, अजून मिळणार नाहीत; तरी काही लागले तर सांग असे लिहिलेली पत्रे आजही आहेत. एक काळ असा होता, मुंबईमध्ये असून बँक अकाऊंटमध्ये केवळ ८४ रुपये होते, ते काढतासुद्धा येत नव्हते, त्यामुळे येता-जाता बँकेला नमस्कार करून लक्ष असू द्या, असा अनुभव शेअर केला आहे.
संघर्षमय काळातील पत्रे आजही ठेवली जपून
गौरव गिराने २४ व्या वर्षीसुद्धा स्वाभिमान आणि कष्ट करण्याची तयारी असल्याचे सांगितले आहे. गौरव म्हणाला, “आता आयुष्यात मागे वळून पाहिले तर माझा दृष्टिकोनसुद्धा बरोबर होता असे वाटते. मी घरी लिहिलेल्या पत्रांमध्ये कुटुंबासाठी काळजी, घरातील झाडांची चौकशी केल्याचे लिहिले आहे. तसेच मी मेहनत घेतो आहे आणि भविष्य उज्ज्वल आहे, असे पत्रामध्ये लिहिले होते. असा विचार करणारा माझ्यासारखा मुलगा जर भेटला, तर त्याला पूर्ण पाठिंबा देईन,” असे गौरव गिरा म्हणाला आहेत.
