Dhurandhar Marathi Review: अभिनेता रणवीर सिंहचा बहुप्रतिक्षित ‘धुरंधर’ आज, ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाची अनोखी संकल्पना आणि अभिनेत्याच्या जबरदस्त लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या ब्लॉकबस्टर स्पाय थ्रिलरकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. चित्रपटात रणवीर सिंग ‘द रॅथ ऑफ गॉड’ या कोडनेम असलेल्या रॉ एजंटची भूमिका साकारत आहे.

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा २०२५ मधील मोस्ट अवेटेड बॉलीवूड चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, संजय दत्त, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना आणि आर माधवन मुख्य भूमिकेत आहेत. ‘धुरंधर’ कसा आहे, फर्स्ट डे, फर्स्ट शो बघणाऱ्या प्रेक्षकांना ‘धुरंधर’ कसा वाटला? ते जाणून घेऊयात.

‘धुरंधर’चे एक्स रिव्ह्यू

धुरंधरचा पूर्वार्ध अॅव्हरेज आहे. पहिले २०-२५ मिनिटे खूप उत्साहाने सुरू होतात आणि त्यात दोन अ‍ॅक्शन ब्लॉक्स आहेत जे उत्तम आहेत. पण, पहिला भागच जवळजवळ दोन तास चालतो, ज्यामध्ये अनेक दृश्ये ताणलेली आणि अनावश्यक वाटतात. काही रोमँटिक सीन्स देखील आहेत. रणवीर सिंहचा स्क्रीन प्रेझेन्स खिळवून ठेवतो. पण काही दृश्यांमुळे स्क्रीनप्ले इतका दमदार वाटत नाही. पण इंटर्व्हल एका दमदार पॉइंटवर संपतो, त्यामुळे दुसऱ्या भागाची उत्सुकता वाढते, असं एका युजरने लिहिलं आहे.

धुरंधरला बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यापासून कुणीच रोखू शकत नाही, अशी पोस्ट एका युजरने एक्सवर केली आहे.

“धुरंधर खूप आवडला. आकर्षक गाणी, रणवीर सिंह आणि सारा अर्जुन यांच्यातील उत्तम केमिस्ट्री आणि आकर्षक पटकथा. अ‍ॅक्शन जबरदस्त आहे. नक्की पहावा असा चित्रपट,” अशी पोस्ट एका युजरने केली आहे.

धुरंधरमध्ये सर्व कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. पण चित्रपट उगाच ताणलाय. रिकाम्या थिएटरमध्ये १५ मिनिटे एका तासासारखी वाटत होती, अशी पोस्ट एका युजरने केली आहे.

एका युजरने अक्षय खन्नाच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.