गेल्या काही दिवसांपासून ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शित झाल्यापासून आदित्य धर दिग्दर्शित हा सिनेमा सिनेमागृहात राज्य करत आहे. या सिनेमाने अनेक सिनेमांचे रेकॉर्ड मोडले आहेत. फक्त भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरात या सिनेमाची चर्चा सुरू आहे. संपूर्ण जगभरातून सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. धुरंधर २ ने बॉक्स ऑफिसवर २४ दिवसांत किती कमाई केली आहे, हे जाणून घेऊ…
सॅल्कनिकनुसार, या चित्रपटाने शनिवारी म्हणजेच २४ व्या दिवशी १३.५० कोटींची कमाई केली. यांसह २४ दिवसांत या सिनेमाची भारतात एकूण कमाई १०६८.९२ कोटी इतकी झाली आहे. तर जगभरात या सिनेमाने एकूण १६९१.३० कोटींची कमाई केली आहे.
आता या सगळ्यात ‘धुरंधर २’ म्हणजेच धुरंधर: द रिव्हेंज हा सिनेमा ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार, याबद्दलही चर्चा होताना दिसत आहे.
सिनेमाची दररोज होणारी कमाई पाहता हा सिनेमा इतक्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार नसल्याचे म्हटले जात आहे. धुरंधर हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. पण, धुरंधर २ हा नेटफ्लिक्सवर नाही तर जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. बी६२स्टुडिओ आणि जिओ हॉटस्टारने चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यामुळे, धुरंधर २ हा सिनेमा जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, चित्रपट निर्माते सिनेमा लगेच ओटीटीवर प्रदर्शित करणार नाहीत. ८ आठवडे सिनेमा चित्रपटगृहांमध्ये दाखवला गेल्यानंतर तो सिनेमा ओटीटीवर दाखवला जाऊ शकतो. पण, सिनेमा फक्त आठ आठवडेच दाखवला गेला पाहिजे असे नाही. त्यापेक्षाही अधिक काळ सिनेमा चित्रपटगृहांत दाखवला जाऊ शकतो. सध्या सिनेमा बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करत असल्याने तो आणखी काही काळ थिएटरमध्ये दाखवला जाईल.
पुष्पा २ व दंगल या सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांचे रेकॉर्ड मोडण्याची संधी धुरंधर २ कडे आहे. आमिर खानच्या सिनेमाने २०१६ मध्ये संपूर्ण जगभारत २०७०.३० कोटींचे ग्रॉस कलेक्स केले होते. त्यामुळे येत्या काळात हा सिनेमा ‘दंगल’चे रेकॉर्ड मोडणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
