बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट निर्मित ‘पोचर’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वेबसीरिजमध्ये दिव्येंदू भट्टाचार्य एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकले. त्यांनी बऱ्याच हिंदी आणि बंगली चित्रपटात छोट्या पण महत्त्वाच्या अशा भूमिका निभावल्या आहेत. नुकतंच त्यांनी चित्रपटसृष्टीत होणाऱ्या वर्णभेदाबद्दल भाष्य केलं आहे. जे दिसायला फारसे गोरे नाहीत, ज्यांचा रंग सावळा अन् थोडा आणखी डार्क आहे त्यांना इंडस्ट्रीमध्ये चांगल्या भूमिका मिळत नाही असा खुलासा दिव्येंदू यांनी केला.

एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान दिव्येंदू भट्टाचार्य यांनी याबद्दल वक्तव्य केलं. ते म्हणाले, “माझ्याकडे ज्या प्रकारचं काम येतं ते मी करतो. ५०० कोटींच्या चित्रपटात झळकायला हवं अशी माझी कधीच अपेक्षा नसते. किंबहुना मला तशा बिग बजेट चित्रपटांच्या ऑफर्सदेखील मिळत नाहीत. पण माझ्याकडे जे काम येतं ते मी अत्यंत काळजीपूर्वक आणि प्रामाणिकपणे करतो.”

The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
sanjay-leela-bhansali-priyanka-chopra
नऊ वर्षांनी प्रियांका चोप्रा झळकणार संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात; देसी गर्ल लवकरच करणार घोषणा
randeep-hooda-savarkar3
“मी माझं घर विकून…”, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबद्दल रणदीप हुड्डाचं मोठं वक्तव्य

आणखी वाचा : “ही तर १२वी पास…” हार्वर्डमध्ये लेक्चर द्यायला गेलेल्या करिश्मा कपूरला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

याबरोबरच दिव्येंदू यांनी इंडस्ट्रीतील वर्णभेदावरही भाष्य केलं. ज्यांचा रंग गोरा नाही म्हणजेच जे सावळे आणि अधिक डार्क रंगाचे आहेत त्यांना सकारात्मक भूमिका मिळत नसल्याची खंतही त्यांनी या मुलाखतीमध्ये व्यक्त केली. वर्णभेदावर भाष्य करताना दिव्येंदू यांनी बॉलिवूड आणि हॉलिवूड यांची तुलना केली आहे. हॉलिवूडमध्ये सर्व वर्णाच्या लोकांना चित्रपटात घेणे बंधनकारक असते असा खुलासा त्यांनीक केला. भारतात मात्र हे प्रमाण वाढताना दिसत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

दिव्येंदू भट्टाचार्य म्हणाले, “मला असं वाटतं की भारतीय अधिकच वर्णभेद करायला लागले आहेत. भारताबाहेर होणारा वर्णभेद हा फार भयानक आहे अन् त्यांना यातून बाहेर पडायचं आहे. त्यांना या गोष्टीची लाज वाटते, ही एक जागतिक समस्या आहे.” पुढे एका मालिकेचं उदाहरण देत ते म्हणाले, “मी एकेदिवशी टेलिव्हिजनवर श्री कृष्ण याच्यावर बेतलेला एक शो बघत होतो ज्यात उजळ त्वचेच्या व्यक्तीला कृष्ण म्हणून घेण्यात आले होते, तेव्हा मला हे समजलं की चक्क कृष्णालाही ही लोक गोरा दाखवू शकतात, हे फक्त भारतीयच करू शकतात.” दिव्येंदू भट्टाचार्य हे ‘देव डी’, ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘द रेल्वे मॅन’ व ‘रॉकेट बॉयज’सारख्या चित्रपट आणि सीरिजमध्ये झळकले आहेत.