गायक दिलजीत दोसांझने पंजाबी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीला सुपरहिट गाणी दिली आहेत. दिलजीत जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. गाण्यांबरोबर दिलजीत आपल्या वक्तव्यांमुळेही चर्चेत असतो. कंगना राणौत आणि दिलजीतमध्ये झालेला 'ट्विटर वॉर'ची चर्चचा विषय बनला होता. दिलजीत पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. दिलजीत आणि गायिका टेलर स्विफ्ट एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या चर्चांवर आता दिलजीतने ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. हेही वाचा- “माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण काळ…”, पोस्ट शेअर करत काजोल देवगणने सोशल मीडियावरील सगळे फोटो केले डिलीट ब्रिटीश कोलंबियाच्या बातमीनुसार दिलजीत आणि टेलर स्विफ्टला व्हँकुव्हरमधील कॅक्टस क्लब कॅफे कोल हार्बर येथे एकत्र पाहण्यात आले होते. दोघेही हसत-हसत एकमेकांशी बोलत होते. बोलताना दोघे एकमेकांच्या जवळ आले असल्याचे सांगण्यात येत आहे. या बातमीनंतर दिलजीत आणि टेलरमध्ये काही तरी सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. खुद्द दिलजीतने या मौन सोडत यावर प्रतिक्रिया दिली आहे. दिलजीतने ट्वीटमध्ये लिहल आहे "यार प्रायव्हसी नावाची गोष्ट असते" मात्र, त्याने हे ट्वीट काही वेळातच डिलीट केले. दिलजीतने ट्वीट डिलीट केल्यामुळे आता वेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. दिलजीने ट्वीट डिलीट का केले? असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत दिलजीतच्या वर्कफ्रंटबाबत बोलायच झालं तर तो आपला बराच वेळ अमेरिकेत घालवतो. अलीकडेच त्याचा कोचेला येथे मोठा कॉन्सर्टही आयोजित करण्यात आला होता. दिलजीत 'अमर सिंह चमकीला' चित्रपटात एकत्र दिसणार आहे. ३० मे रोजी जेव्हा या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला तेव्हा बरीच चर्चा झाली. या चित्रपटात दिलजीतबरोबर परिणीती चोप्रा देखील मुख्य भुमिकेत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.