Premium

“रामायण हे…”; ‘आदिपुरुष’ ट्रेलरमधील सीताहरण दृष्यावर दीपिका चिखलिया यांचं भाष्य ; म्हणाल्या…

‘आदिपुरुष’चा अंतिम ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.

aadipurush
आदिपुरुष' ट्रेलरमधील सीताहरण दृष्यावर दीपिका चिखलिया यांचा आक्षेप

दाक्षिणात्य अभिनेता प्रभास आणि क्रिती सेननचा बहुचर्चित ‘आदिपुरुष’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकताच तिरुपतीमध्ये चित्रपटाचा अंतिम ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरमध्ये रावणाने सीतेचं हरण कसं केलं याबाबतचा सीन दाखवण्यात आला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- लांब जटा, अंगाला भस्म अन् गळ्यात रुद्राक्षांची माळ; पोस्टरमधील ‘या’ अभिनेत्याला तुम्ही ओळखलं का?

आता या चित्रपटाच्या ट्रेलरवर रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांनी आक्षेप घेतला आहे. ट्रेलरमधील काही दृष्यांचा संदर्भ लागत नसल्याचं मत चिखलिया यांनी व्यक्त केलं आहे. “जेव्हा कृती सेनन (सीता) रावणाला भीक्षा देण्यासाठी लक्ष्मण रेषा ओलांडते तेव्हा अचानक विजा चमकू लागतात. तसेच ट्रेलमध्ये सीता रावणाच्या मागे जाताना दाखवण्यात आलं आहे. हे पूर्णपणे चूकीचं आहे” असं चिखलीया म्हणाल्या.

एवढंच नाही तर चित्रपटात वापरण्यात आलेल्या वीएफएक्सवरुनही त्यांनी निर्मात्यांवर निशाणा साधला आहे. चिखलिया यांच्या मते रामायण, महाभारत यांसारख्या कथा भावनाप्रधान असतात. अशा कथांमध्ये, लोक नेहमीच भावनिक पातळीवर पात्रांचा न्याय करतात. मात्र, चित्रपटात भावनांपेक्षा वीएफएक्सचा जास्त वापर करण्यात आला आहे. चित्रपटातील ओव्हर व्हीएफएक्समुळे भावनांचा अभाव दिसून येत असल्याचे त्या म्हणाल्या.

हेही वाचा- रणबीर कपूर ‘आदिपुरुष’ सिनेमाची १० हजार तिकिटे खरेदी करणार, कारण…

‘आदिपुरुष’चा हा नवीन ॲक्शन ट्रेलर जबरदस्त व्हीएफएक्स आणि ॲक्शनने परिपूर्ण असा आहे. या टरेलरच्या सुरुवातीपासूनच नवे व्हीएफएक्स पाहायला मिळतात. पहिल्या ट्रेलरप्रमाणेच या नवीन ट्रेलरची सुरुवातही रावणाने सीतेला पळवून नेण्यापासून होते. तर यानंतर श्रीराम लक्ष्मण आणि हनुमानाबरोबर सीतेला परत आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. यात हनुमान श्रीरामांची अंगठी घेऊन सीतेकडे जातो अशी काही नवीन दृश्यंही दाखवण्यात आली आहेत. तर याचबरोबर या नवीन ट्रेलरमध्ये वानर सेना आणि रावणाच्या सेनेमध्ये धुवाधार युद्ध होताना दिसत आहे. आणि या ट्रेलरच्या अखेरीस श्रीराम हनुमानाच्या पाठीवर बसून रावणाचा वध करताना दिसत आहेत.

‘आदिपुरुष’ चित्रपट येत्या १६ जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभास दाक्षिणात्य अभिनेता प्रभासने श्रीरामाची भूमिका साकारली आहे. तर क्रिती सेनॉन सीता मातेच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने हनुमानाची भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-06-2023 at 17:29 IST
Next Story
जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयशा यांची ५८ लाख रुपयांची फसवणूक; आरोपीविरोधात गुन्हा दाखल