‘भीड’ चित्रपटाला वादाचा फटका; प्रेक्षकांनी फिरवली पाठ, पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ लाख

अनुभव सिन्हा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे

bheed-final
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

करोनामुळे देशभरात अचानक जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सर्वसामान्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. देशात अंतर्गत सीमा आखल्या गेल्या. अन्न- वस्त्र, निवारा, वाहतुकीची साधने अशा कोणत्याही मूलभूत सुविधा नाकारली गेलेली अनेक माणसे या काळात परागंदा झाली. अनेकांचे रोजगार गेले. लाखों लोकांनी आपआपल्या घरी परतण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले. लॉकडाउनच्या काळातील हे भयाण वास्तव मांडणारा ‘भीड’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.

‘आर्टिकल १५’, ‘अनेक’, ‘मुल्क’, ‘थप्पड’ अशा वेगळ्या धाटणीचे, रोखठोक वास्तव आशय-विषयाची मांडणी असलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी ‘भीड’चे दिग्दर्शन केले आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. माध्यमांच्या माहितीनुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी १५ लाखांची कमाई केली आहे. इतर चित्रपटांच्या तुलनेने या चित्रपटाला थंड प्रतिसाद मिळत आहे. येत्या काही दिवसात चित्र स्पष्ट होईल.

“आता यशराज यांची गरज…” बॉलिवूडमधील अपयशी चित्रपटांबद्दल ‘शार्क टॅंक’ फेम अश्नीर ग्रोव्हरने मांडलं स्पष्ट मत

या चित्रपटाला बराच विरोधदेखील झाला आहे. हा चित्रपट भारतविरोधी असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. युट्यूबवरुन ट्रेलरही काही तासांत हटवण्यात आला. सुरुवातीला कोणाच्या लक्षात आलं नाही, पण आता हे प्रकरण चांगलंच तापलं आहे. सोशल मिडियावर या चित्रपटाचा ट्रेलर हटवण्यावरुन चांगलाच विरोध होताना दिसत आहे.

या चित्रपटात भूमीबरोबरच राजकुमार राव व आशुतोष राणाच, दिया मिर्झा, पंकज कपूर, विरेन्द्र सक्सेनासारखे मातब्बर कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘भीड’ हा चित्रपट कल २४ मार्चला देशभरात प्रदर्शित झाला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 16:17 IST
Next Story
चुलत बहिणीबरोबरच दीपिका पदुकोणच्या वडिलांनी थाटला संसार, अभिनेत्रीच्या वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…
Exit mobile version