"मी नवीन कलाकारांचा वापर करतो कारण..." चित्रपटांमधील कास्टिंगवर अनुराग कश्यपचं मोठं वक्तव्य spg 93 | director anurag kashyap open up about new coming actors and how he use them | Loksatta

“मी नवीन कलाकारांचा वापर करतो कारण…” चित्रपटांमधील कास्टिंगवर अनुराग कश्यपचं मोठं वक्तव्य

अनुराग कश्यपचा ऑल्मोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत हा चित्रपट ३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे

anurag
फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप हा त्याच्या चित्रपटांमुळे आणि त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे बऱ्याचदा चर्चेत असतो. अनुराग सोशल मीडियावरदेखील सक्रीय असतो. अनुराग कश्यप कायमच बॉलिवुडविषयी भाष्य करताना दिसून येतो. नुकतेच त्याने बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी येणाऱ्या नवीन कलाकारांबद्दल वक्तव्य केलं आहे.

ब्लॅक फ्रायडे’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘अग्ली’, ‘रमन राघव 2.0’ आणि ‘देव.डी’ यांसारख्या वेगवेगळ्या धाटणीचे अनुराग कश्यपने दिले आहेत. त्याने आपल्या चित्रपटांमध्ये कायमच नवीन कलाकारांना संधी दिली आहे. याच कलाकारांबद्दल त्याने बॉम्बे जर्नी या कार्यक्रमात भाष्य केलं आहे. त्याला विचारण्यात आले की कायम नवीन कलाकरांबद्दल का काम करतोस? त्यावर अनुराग म्हणाला, “नव्या कलाकारांमध्ये भूक असते. चित्रपटाच्या प्रक्रियेमध्ये जास्त प्रश्न विचारत नाहीत. जेव्हा कलाकार स्टार बनतो तेव्हा गोष्टी बदलतात, इतर लोकांचे चित्रपट तो करत असतो. स्टारडम मिळते. यामुळे चित्रपटाला नुकसान होते.”

नवाजुद्दीन सिद्दीकीवर पत्नीच्या वकिलांनी केले गंभीर आरोप; म्हणाले “७ दिवस तिला घरात…”

तो पुढे म्हणाला, “जस की ‘बॉम्बे वेलवेट’ चित्रपटात मोठे स्टार नसते तर आम्ही चित्रपटाच्या ओपनिंगवर फोकस करू शकलो नसतो . चित्रपटाच्या ओपनिंगवर दिले तर चित्रपटातला डीएनए निघून जातो. नव्या लोकांबरोबर काम करताना हे स्वातंत्र्य मिळते म्हणून मी नवीन लोकांबरोबर काम करतो. लोकांना असं वाटत की नव्या कलाकारांना संधी देतो मात्र तसे नाहीये मी नव्या कलाकारांचा वापर करतो.” असे त्याने सांगितले.

अनुराग कश्यप दिग्दर्शित आगामी ‘ऑल्मोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. करण मेहता, अलाया एफ यात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकतंच अभिनेता विकी कौशल यात ‘डिजे मोहब्बत’च्या भूमिकेत दिसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे, त्याचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट ३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 17:14 IST
Next Story
Video: “वडिलांकडून काहीतरी शिक…” शाहरुख खानचा लेक आर्यन ‘त्या’ कृतीमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर