Director Atlee daughter name reveal : लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शक अ‍ॅटली दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. अ‍ॅटली आणि पत्नी प्रिया अ‍ॅटली यांनी घरी लक्ष्मी आल्याची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यांना २० एप्रिल २०२६ रोजी कन्यारत्न प्राप्त झाले. आता या जोडप्याने आपल्या गोंडस मुलीचे नाव जाहीर केले असून बाळाचे नाव ‘मियू’ असे ठेवले आहे.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अ‍ॅटली आणि प्रिया अ‍ॅटली यांनी आपल्या चिमुकल्या मुलीचे नाव जाहीर केले. बाळाच्या हाताचा फोटो शेअर करत आमच्या बाळाला नवीन नावं मिळाले..मियू…, असे लिहित त्यांनी गोंडस मुलीचे नाव जाहीर केले.

आमच्या हृदयाजवळ असणारी चिमुकली व्यक्ती’ असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. अ‍ॅटली आणि प्रियाच्या या पोस्टवर दाक्षिणात्य आणि बॉलीवूड मनोरंजन विश्वातील अनेकांनी प्रतिक्रियांद्वारे दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. अ‍ॅटली आणि प्रियाला आधी एक मुलगा असून त्याचे नाव मीर असे आहे.

मुलीचे नाव जाहीर करत अ‍ॅटली आणि प्रियाने नावाचा अर्थ देखील सांगितला आहे. सौंदर्य, कोमलता आणि प्रेम असा मियू नावाचा अर्थ सांगितला आहे. मीर, प्रिया आणि अ‍ॅटलीकडून खूप खूप प्रेम…! अशा कॅप्शनसह नाव जाहीर केले आहे. अ‍ॅटलीने २० एप्रिल रोजी कन्यारत्न झाल्याची खास कार्टुन स्टाईल पोस्ट करुन गोड बातमी दिली होती. त्यांचा मुलगा ‘मीर’ आपल्या लहान बहिणीच्या जन्माचा आनंद साजरा करताना दाखवला होता.

अ‍ॅटली आणि प्रियाने अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१४ साली लग्न केले. लग्नानंतर आठ वर्षांनी अ‍ॅटली आणि प्रियाला पहिले बाळ झाले. २०२३ मध्ये त्यांनी मीर नावाच्या गोंडस मुलाला जन्म दिला. यानंतर आता २०२६ मध्ये त्यांच्या घरी लहान परीचे आगमन झाले आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीमध्ये अ‍ॅटली लोकप्रिय दिग्दर्शक असून त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतात. ‘राजा राणी’, ‘थेरी’, ‘मर्सल’, आणि ‘बिगिल’ यांसारख्या चित्रपटांचे त्याने दिग्दर्शन केले. यानंतर शाहरुख खान मुख्य भूमिकेमध्ये असलेल्या जवान चित्रपटातून अ‍ॅटलीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. ॲटली सध्या त्याच्या आगामी ‘राका’ (Raaka) या चित्रपटावर काम करणार आहे. यामध्ये अल्लू अर्जुन आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिका साकारणार आहेत.