श्रीदेवी यांनी 'इंग्लिश विंग्लिश' चित्रपटात नेसलेल्या साडीचा होणार लिलाव; या कारणासाठी दिग्दर्शिकेने घेतला निर्णय | director gauri shinde declares that icnonic saree of sridevi in english vinglish to be auctioned | Loksatta

श्रीदेवी यांनी ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटात नेसलेल्या साडीचा होणार लिलाव; या कारणासाठी दिग्दर्शिकेने घेतला निर्णय

येत्या १० ऑक्टोबरला या चित्रपटाचं खास स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं आहे.

श्रीदेवी यांनी ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटात नेसलेल्या साडीचा होणार लिलाव; या कारणासाठी दिग्दर्शिकेने घेतला निर्णय
श्रीदेवी इंग्लिश विंग्लिश | sridevi english vinglish

दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं चित्रपट रसिकांच्या मनातील स्थान अढळ आहे. आजही भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांची उणीव जाणवते. श्रीदेवी यांच्या अकाली मृत्यूमुळे तेव्हा संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली होती. बॉलिवूडची ‘हवाहवाई’ म्हणून कित्येकांच्या मनावर राज्य करणाऱ्या श्रीदेवी यांचा ‘इंग्लिश विंग्लिश’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. मोठ्या पडद्यावर श्रीदेवी यांचं पुनरागमन याच चित्रपटातून झालं होतं. हा चित्रपट आणि त्यातील त्यांचं शशी हे पात्र प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर घेतलं होतं.

या चित्रपटाची दिग्दर्शिका गौरी शिंदे हिने या चित्रपटाची १० वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त एक खुशखबर श्रीदेवी यांच्या चाहत्यांना दिली आहे. या चित्रपटात श्रीदेवी यांनी नेसलेल्या आयकॉनीक साडीचा लिलाव आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती गौरी शिंदे हिने दिली आहे. ५ ऑक्टोबर २०१२ या दिवशी ‘इंग्लिश विंग्लिश’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. परदेशात गेल्यावर इंग्रजी भाषेची होणारी अडचण आणि त्यासाठी मेहनत घेणाऱ्या गृहिणीचा प्रवास यातून मांडण्यात आला होता.

आणखी वाचा : पतौडी घराण्यातील धाकटी मुलगी एकेकाळी बँकेत करायची काम; सध्या आहे चित्रपटसृष्टीपासून दूर

इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना दिग्दर्शिका गौरी शिंदे हिने याबाबतीत मोठा खुलासा केला आहे. या चित्रपटात श्रीदेवी यांनी नेसलेल्या सगळ्या साड्या गौरीने जपून ठेवल्या आहेत. आता त्यातील एका साडीचा लिलाव करण्यात येणार असल्याचं गौरीने स्पष्ट केलं आहे. ती म्हणते, “‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटाला १० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आम्ही येत्या १० ऑक्टोबरला या चित्रपटाचं खास स्क्रीनिंग आयोजित केलं आहे. शिवाय या चित्रपटात श्रीदेवी यांनी नसलेल्या साडीचा आम्ही लिलाव करणार आहोत. त्यातून येणारे पैसे मुलींच्या शिक्षणासाठी एका सेवाभावी संस्थेला देण्याचा मी निर्णय घेतला आहे.”

गौरीच्या या चित्रपटामधून श्रीदेवी यांनी १५ वर्षांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘पुली’ या तामीळ चित्रपटात आणि ‘मॉम’ या हिंदी चित्रपटात श्रीदेवी यांच्या कामाची खूप प्रशंसा झाली होती. शाहरुख खानच्या ‘झीरो’ या चित्रपटात श्रीदेवी या पाहुण्या कलाकार म्हणून दिसल्या होत्या. २०१८ साली फेब्रुवारी महिन्यात श्रीदेवी यांचं निधन झालं.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“आम्ही चित्रपटासाठी कोणतेही… ” ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे व्हीएफएक्स करणाऱ्या कंपनीने केला खुलासा

संबंधित बातम्या

“सिगारेटचे चटके…” सलमान खानवर एक्स गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप
अभिनेत्री काजोलने पत्रकारांना लगावला टोला, म्हणाली, “तुम्ही काही कामाचे… “
अविश्वसनीय सत्यकथेवर आधारलेला ‘ऐ जिंदगी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
“…म्हणून मला आईने कपडे काढून घराबाहेर उभं केलं होतं”, अनुपम खेर यांनी सांगितला ‘तो’ किस्सा
उत्तर प्रदेशमध्ये राहताना प्रियांका चोप्राला वाटते भीती; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “संध्याकाळी सातनंतर…”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती; निती आयोगाच्या धर्तीवरील संस्थेत ठाण्याचे विकासक अजय आशर
डिसेंबर सर्वाधिक थंडीचा महिना; राज्यभर किमान तापमान सरासरीखाली
श्रद्धा वालकर हत्या प्रकरण : आफताबच्या ‘नार्को’नंतरची चौकशी तिहार कारागृहात पूर्ण
जत तालुक्याला पाणी योजनांसाठी निधी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
सरकारतर्फे वर्षभर कार्यक्रमांची रेलचेल ; पं. कुमार गंधर्व जन्मशताब्दी