वासन बाला दिग्दर्शित आलिया भट्ट (Alia Bhatt)ची प्रमुख भूमिका असलेला ‘जिगरा’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. आता या चित्रपटाच्या अपयशाची जबाबदारी वासन बाला यांनी घेतली आहे.

दिग्दर्शक वासन बाला यांनी नुकतीच ‘फीवर एफएम’ला मुलाखत दिली. यावेळी ‘जिगरा’ चित्रपटाबद्दल बोलताना त्यांनी म्हटले, “काहीतरी चुकले असेल ना? त्यामुळेच प्रेक्षक या चित्रपटापासून दूर राहिले. असे काहीतरी असेल ना, ज्यामुळे प्रेक्षकांना वाटले की हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये येण्याची गरज नाही. काय चुकले आहे, याचे मला विश्लेषण करावे लागेल. जर एखाद्या कलाकाराने त्याचा संपूर्ण वेळ द्यायचे ठरवले असेल, तर तुम्हाला त्या योग्यतेचा चित्रपट बनवणे गरजेचे आहे.”

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

“आलियाने या चित्रपटात काम करण्याचे निवडले”

आलिया भट्टबद्दल बोलताना त्यांनी म्हटले, “आलिया सगळ्यांची पहिली पसंती आहे. ‘जिगरा’ऐवजी ती इतर कोणत्यातरी चित्रपटाच्या सेटवर असू शकली असती. मात्र, आलियाने या चित्रपटात काम करण्याचे निवडले. तिने माझ्यावर विश्वास ठेवला, त्यामुळे तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर पोहचवणे माझे काम आहे. कारण आम्ही चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रातदेखील आहोत.”

ज्या दिवशी ‘जिगरा’ चित्रपट प्रदर्शित झाला, त्या दिवशी या चित्रपटाने भारतात फक्त ४.५५ कोटींची कमाई केली. सॅकनिकने दिलेल्या माहितीनुसार ११ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने २७.३० कोटींची कमाई केली आहे.

धर्मा प्रोडक्शनने या चित्रपटाचे प्री-रिलीज स्क्रीनिंग न करण्याचा निर्णय घेतला. याचे कारण सांगताना चित्रपटाबद्दल उत्सुकता कायम राहावी, यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे म्हटले होते. अभिनेत्री दिव्या खोसलाने ‘सावी’ चित्रपटाच्या कथानकासारखीच ‘जिगरा’ चित्रपटाची कथा असल्याचे म्हटले होते. याबरोबरच अभिनेता बिजौ थांगजामने ‘जिगरा’च्या कास्टिंग टीमवर अव्यावसायिक वर्तन केल्याचा आरोप केला होता. यादरम्यान वासन बाला यांनी त्यांचे एक्स अकाउंट बंद केले होते.

हेही वाचा: नीतू कपूर यांनी सांगितला ऋषी कपूर यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीत काम करण्याचा अनुभव; म्हणाल्या, “मी थरथरत…”

आता आलिया भट्टचा हा चित्रपट एकूण किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader