scorecardresearch

‘आदिपुरुष’ प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात, मात्र प्रभास-सैफ अली खानने घेतलं कोट्यवधी रुपयांचं मानधन

‘आदिपुरुष’ चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटासाठी कलाकारांनी कोट्यावधी रुपयांचं मानधन घेतलं आहे.

‘आदिपुरुष’ प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात, मात्र प्रभास-सैफ अली खानने घेतलं कोट्यवधी रुपयांचं मानधन
‘आदिपुरुष’ चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटासाठी कलाकारांनी कोट्यावधी रुपयांचं मानधन घेतलं आहे.

प्रभास-सैफ अली खानचा ‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. प्रभास चित्रपटामध्ये भगवान राम यांच्या भूमिकेमध्ये काम करताना दिसणार आहे. तर सैफ रावणाची भूमिका साकारत आहे. पण या दोघांचा चित्रपटामधील लूक समोर आल्यानंतर चित्रपट बॉयकॉट करा अशी नेटकरी मागणी करत आहेत. अशामध्येच आता राजकीय नेतेही चित्रपटाला विरोध करत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणार की नाही? हा प्रश्न समोर असतानाच ‘आदिपुरुष’च्या कलाकारांचे मानधनाचे आकडे समोर आले आहेत.

आणखी वाचा – ‘आदिपुरुष’च्या ट्रोलिंगबाबत पहिल्यांदा स्पष्टच बोलला दिग्दर्शक ओम राऊत, म्हणाला, “लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून…”

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार २०२३मधील हा सर्वात महागडा हिंदी चित्रपट असणार आहे. चित्रपटामधील कलाकारांनी यासाठी सर्वाधिक मानधन घेतले असल्याची चर्चा आहे. प्रभाससह सैफने ‘आदिपुरुष’साठी कोट्यावधी रुपयांचं मानधन घेतलं आहे. या कलाकारांच्या मानधनाचे आकडे ऐकून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

इंडिया टीव्हीच्या वृत्तानुसार, चित्रपटामधील भगवान राम या भूमिकेसाठी प्रभासने सर्वाधिक मानधन घेतलं आहे. १०० ते १५० कोटी रुपये मानधन त्याने घेतलं असल्याचं बोललं जात आहे. रावणाची भूमिका साकारणाऱ्या सैफचं मानधन १२ कोटी रुपये आहे. प्रभासचं मानधन इतर कलाकारांपेक्षा कित्येक पटीने अधिक आहे.

आणखी वाचा – Video : प्राजक्ता माळीच्या घराची सफर, अभिनेत्रीने आपल्या हक्काच्या घराची केली सुंदर सजावट

या चित्रपटामध्ये सीताची भूमिका साकाणाऱ्या क्रिती सेनॉनने ३ कोटी रुपये मानधन घेतं आहे. तर अभिनेता सनी सिंहचं मानधन फक्त १ कोटी ५० लाख रुपये आहे. रामायणावर आधारित या चित्रपटाच्या व्हीएफएक्ससाठी अधिक खर्च करण्यात आला असल्याचीही चर्चा आहे. कलाकारांचं मानधन तसेच चित्रपटाचा बिग बजेट पाहता दिग्दर्शक ओम राऊतला फायदा होणार की तोटा याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या