‘दामिनी’, ‘घातक’, ‘घायल’, खाकी’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’ ‘अंदाज अपना अपना’सारखे चित्रपट देणारे राजकुमार संतोषी सध्या चर्चेत आहेत. अनेक वर्षांनंतर त्यांचा चित्रपट येत आहे . त्या चित्रपटाचं नाव आहे ‘गांधी-गोडसे एक युद्ध’, नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. हे चित्रपट एकमेकांना टक्कर देणार आहेत. यावरच राजकुमार संतोषी यांनी भाष्य केलं आहे.

८० चं दशक गाजवणारे राजकुमार संतोषी नुकतेच ट्रेलर लाँचच्या वेळी असं म्हणाले की, “शाहरुख खान उत्तम अभिनेता, माणसू आहे. तो माझ्या चांगला परिचयाचा आहे. एक मेहनती नट आहे. यशराज निर्मितीसंस्थेचा हा चित्रपट येत आहे माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र माझ्या चित्रपटाचा प्रेक्षक वर्ग वेगळा आहे. यात गाणी डान्स नाहीत हा वेगळा चित्रपट आहे. दोन्ही चित्रपट आपापल्या जागी आहेत मी याची कधी चिंता केली नाही.” अशा शब्दात त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Sharad Pnkshe reaction on Article 370
यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Mrunmayee Deshpande talks about her character in Swargandharva Sudhir Phadke Movie
इन्स्टाग्रामवरील ‘या’ रीलमुळे मृण्मयी देशपांडेला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात मिळाली भूमिका, म्हणाली, “माझ्याबाबतीत…”

“नथुरामच्या भूमिकेसाठी बॉलिवूडचा स्टार…” ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा खुलासा

दरम्यान ‘‘गांधी-गोडसे एक युद्ध’ चित्रपटाची पटकथा दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांचं असून ए आर रहमान यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. या महिन्यात प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच २६ जानेवारी २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटप्रेमी आणि राजकुमार संतोषी यांचे चाहते या चित्रपटासाठी चांगलेच उत्सुक आहेत.

पठाण हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातून शाहरुख चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार असल्याने त्याचे चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे या चित्रपटाबाबत मोठा वाद निर्माण झाल्यानंतर या चित्रपटात काही बदल करण्यात आले आहेत