‘दामिनी’, ‘घातक’, ‘घायल’, खाकी’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’ ‘अंदाज अपना अपना’सारखे चित्रपट देणारे राजकुमार संतोषी सध्या चर्चेत आहेत, नुकताच त्यांच्या ‘गांधी-गोडसे एक युद्ध या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबद्दल दिग्दर्शकांनी आपली भूमिका मांडली आहे.

८० चं दशक गाजवणारे राजकुमार संतोषी ‘गांधी-गोडसे एक युद्ध हा चित्रपट बऱ्याच वर्षांनंतर घेऊन येत आहेत. ते असं म्हणाले की, “माझ्या मते एखादी व्यक्ती मला आवडू शकत नाही पण मी त्याच्यासाठी लढेन, लोकशाही व्यवस्थेत ते केले जाते. गोडसेचा आवाज तेव्हा दाबला गेला असं मला वाटतं . जे झालं ते लोकांनी समजून घेऊन त्यावर विचार करणं आवश्यक आहे. हा धार्मिकदृष्ट्या प्रेरित चित्रपट वाटेल पण यात जे काही सांगितलं आहे ते गोडसे आणि महात्मा गांधी यांनी सांगितलं आहे.”

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Mrunmayee Deshpande talks about her character in Swargandharva Sudhir Phadke Movie
इन्स्टाग्रामवरील ‘या’ रीलमुळे मृण्मयी देशपांडेला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात मिळाली भूमिका, म्हणाली, “माझ्याबाबतीत…”
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

‘गांधी-गोडसे’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाबरोबर आता ‘हा’ अभिनेता झळकणार; तब्बल २४ वर्षांनी करणार काम

ते पुढे म्हणाले, “आम्ही टीझर आणि ट्रेलर अशा प्रकारे कट केला आहे की लोक चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहण्यास उत्सुक असतील. त्यांना पाहू द्या आणि मग ते सहमत आहेत की असहमत हे ठरवा. इतिहासात यापूर्वी कोणीही असा प्रयत्न केला नाही. या चित्रपटातून लोक गोडसेला ओळखतील, मी चित्रपटात कोणतीही बाजू घेतली नाही, जर मी तसे केले असते तर मी माझ्या चित्रपटाला न्याय दिला नसता,” अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान ‘‘गांधी-गोडसे एक युद्ध’ चित्रपटाची पटकथा दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांचं असून ए आर रहमान यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. या महिन्यात प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच २६ जानेवारी २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटप्रेमी आणि राजकुमार संतोषी यांचे चाहते या चित्रपटासाठी चांगलेच उत्सुक आहेत..