"तुमचा मृत्यू झाला अन्..." महात्मा गांधींचा फोटो शेअर करत राम गोपाल वर्माचे 'ते' ट्वीट चर्चेत spg 93 | director ram gopal verma shared saracastic post on gandhi godse film | Loksatta

“तुमचा मृत्यू झाला अन्…” महात्मा गांधींचा फोटो शेअर करत राम गोपाल वर्माचे ‘ते’ ट्वीट चर्चेत

राम गोपाल वर्मा आपल्या ट्वीटवरच्या माध्यमातून आपले मत व्यक्त करत असतो

rgv
फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक टीम

राम गोपाल वर्मा बॉलिवूडमधील एक असं नाव आहे जे वादग्रस्त कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतं. राम गोपाल वर्मा अनेकदा अशी काही वक्तव्य करतो ज्यामुळे वादाला तोंड फुटतं. दिग्दर्शक राजामौली असो किंवा पठाण चित्रपट असो राम गोपाल वर्मा आपल्या ट्वीटवरच्या माध्यमातून आपले मत व्यक्त करत असतो. नुकताच त्याने एक फोटो शेअर केला आहे ज्यावरून त्याने ‘गांधी गोडसे ‘चित्रपटावर निशाणा साधला आहे.

राम गोपाल वर्मा आपल्या पोस्टमधून कोणावर तरी निशाणा साधत असतो. कधी कधी थेट भाष्य करतो तर कधी टोले लगावत असतो. त्याने महात्मा गांधीच्या पुतळ्याचा फोटो शेअर केला आहे ज्यात तो पुतळ्याकडे पाहत आहे. त्याने कॅप्शन दिला आहे “तुमचा मृत्यू झाला दुःखी आहे” असा कॅप्शन त्याने लिहला आहे. नुकताच ‘गांधी गोडसे’ चित्रपट प्रदर्शित झाल्याने या चित्रपटाला टोला लगावला आहे असे पोस्टमधून दिसून येत आहे.

“रणबीर, हृतिक रोशनवर टीका झाली नाही कारण…” बॉलिवूडमधील घराणेशाहीवर दिग्दर्शक अनुराग कश्यपचं वक्तव्य चर्चेत

राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘गांधी-गोडसे: एक युद्ध’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात नथुराम गोडसे आणि महात्मा गांधी यांच्या विचारसरणीमधील भिन्नता दाखवण्यात आली आहे. राजकुमार संतोषी दिग्दर्शित या चित्रपटाला मात्र थंड प्रतिसाद मिळताना दिसतोय. ‘गांधी-गोडसे: एक युद्ध’ चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. तेव्हा हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकांनी उत्सुकता दर्शवली होती. मात्र हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट बघणाऱ्यांची संख्या कमी असल्याचं दिसत आहे.

‘गांधी-गोडसे: एक युद्ध’ आणि ‘पठाण’ या चित्रपटात सध्या स्पर्धा पाहायला मिळत आहे. ‘गांधी-गोडसे: एक युद्ध’ या चित्रपटात चिन्मय मांडलेकर नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. नथुराम गोडसे महात्मा गांधींवर गोळ्या झाडतो पण गांधी त्यातून वाचतात आणि नंतर महात्मा गांधी नथुरामला भेटून त्यांच्यात वैचारिक युद्ध रंगतं असं या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 17:13 IST
Next Story
Video: कॅमेऱ्यासमोर चेहरा लपवल्याने दीपिका पदुकोणची राज कुंद्राशी तुलना; नेटकरी म्हणाले “बिकिनी घालून…”