scorecardresearch

‘द कश्मीर फाइल्स’ला ‘कचरा’ म्हणणाऱ्या प्रसिद्ध दिग्दर्शक सईद मिर्झांना विवेक अग्निहोत्रींचं सडेतोड उत्तर, म्हणाले, “मिर्झा साहेबांना…”

द कश्मीर फाइल्स’ला ‘कचरा’ म्हणणाऱ्या दिग्दर्शकाला विवेक अग्नीहोत्रीचं सडेतोड उत्तर.

‘द कश्मीर फाइल्स’ला ‘कचरा’ म्हणणाऱ्या प्रसिद्ध दिग्दर्शक सईद मिर्झांना विवेक अग्निहोत्रींचं सडेतोड उत्तर, म्हणाले, “मिर्झा साहेबांना…”
द कश्मीर फाइल्स’ला 'कचरा' म्हणणाऱ्या दिग्दर्शकाला विवेक अग्नीहोत्रीचं सडेतोड उत्तर.

पटकथा लेखक आणि प्रसिद्ध दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांनी चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान अमुल्य आहे. नसीम’ आणि ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यो आता हैं’ हे त्यांचे चित्रपट चर्चेत राहिले. त्याचबरोबरीने ‘नुक्कड’ व ‘इंतजार’ सारख्या मालिकांचंही त्यांनी दिग्दर्शन केलं. पण सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाबाबत केलेल्या विधानामुळे सईद चर्चेत आहेत.

‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत सईद मिर्झा यांनी विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर आपलं मत मांडलं. ‘द कश्मीर फाइल्स’बद्दल बोलताना सईद मिर्झा म्हणाले, “माझ्यासाठी ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट म्हणजे कचरा आहे. पण मग काश्मिरी पंडितांच्या समस्या म्हणजे कचरा आहेत का? तर नाही. असं नाही अजिबात नाही. त्यांच्या समस्या खऱ्याच आहेत.”

“पण हे फक्त काश्मिरीं हिंदूंनाच सहन करावं लागलं का? तर नाही त्यात काश्मिरी मुस्लीमही आहेत. जे गुप्तचर संस्था, तथाकथित राष्ट्रीय हितसंबंध असलेली राष्ट्रे आणि सीमेपलीकडून पगार घेणारे लोक, जे सतत गोंधळ निर्माण करत आहेत, या सगळ्यांच्या षडयंत्रात अडकले आहेत. मुद्दा बाजू घेण्याचा नाही. माणूस व्हा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा.” त्यांच्या या वक्तव्यावर आता विवेक अग्निहोत्री यांनी उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा – “द काश्मीर फाइल्स’ चित्रपट नव्हे तर कचरा”; प्रसिद्ध दिग्दर्शकाची सडकून टीका म्हणाले, “गुप्तचर संस्था…”

विवेक यांनी ट्विट करत म्हटलं की, “मी म्हणालो मिर्झा साहेबांना सलाम. ‘द दिल्ली फाइल्स’नंतर पुन्हा भेटूच. २०२४.” त्याचबरोबरीने सईद मिर्झा यांच्या वक्तव्याचा स्क्रिनशॉट विवेक यांनी शेअर केला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-12-2022 at 18:43 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या